पुणे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आमदार टिळेकरांचे मामा सतिष वाघ यांचे शेवाळ वाडीतून अपहरण करण्यात आल्याची माहिती आहे. आज सकाळच्या सुमारास सतिष वाघ हे सोलापूर रस्त्यावरील हॉटेलसमोर थांबले होते. तेव्हा एक चारचाकी शेवरलेट एन्जॉय या गाडीतून आलेल्या चौघांनी त्यांचं अपहरण केल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
नक्की वाचा - स्मार्टफोनमुळे मुख्याध्यापकाने गमावला जीव, मोबाइलचा स्फोट का होतो? काय आहेत लक्षणं?
मिळालेल्या माहितीनुसार, सतीश वाघ हे आज सकाळच्या सुमारास सोलापूर रस्त्यावरील ब्लु बेरी हॉटेलसमोर थांबले होते. त्यावेळी अचानक चारचाकी गाडी आली आणि त्यांतील निघालेल्या चौघांनी वाघ यांचं अपहरण केल्याची माहिती आहे. दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणात तपास सुरू आहे.