विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या राजकीय पक्षात एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खरमरीत टिका केली आहे. ही टिका मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यांनीही मग रोहित पवार यांना सुनावत आजोबा शरद पवारांनी काय काय केले याची आठवण करून दिली आहे. शिवाय रोहित यांच्या आरोपांवर भडकून त्यांनाच जाब विचारला आहे. त्यामुळे विखे पाटील यांच्या टिकेला रोहित पवार काय प्रत्युत्तर देतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले होते रोहित पवार?
रोहित पवार यांच्या निशाण्यावर सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. पक्ष फोडले. कुटुंब फोडली. हेच काय ते देवेंद्र फडणवीस यांचे कर्तुत्व अशी टिका रोहित पवार यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राज्यात दोन पक्ष फुटले. कुटुंबात त्यांनीच फुट पाडली. अशा प्रकारचे राजकारण या आधी कधीच महाराष्ट्रात झाले नव्हते असेही रोहित पवार असे म्हणाले. या पुर्वीही रोहित यांनी वारंवार याबाबत देवेंद्र फडणवीसांना लक्ष केले आहे. त्यांची ही टिका भाजप नेत्यांच्या मात्र चांगलीच जिव्हारी लागली आहे.
ट्रेंडिंग बातमी - सुप्रिया सुळेंचा फोन - वॉट्सअप हॅक, केलं मोठं आवाहन
विखे पाटील यांनी डिवचले
रोहित पवार यांच्या या आरोपांना राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ही टिका त्यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यांनी रोहित पवार यांना डिवचताना भूतकाळात काय झाले? कुणी केले? याचीच विचारणा केली आहे. रोहित पवार जर म्हणत असतील की देवेंद्र फडणवीसांनी पक्ष फोडले, घरं फोटली तर त्यांनी पहिला हा प्रश्न त्यांचे आजोबा शरद पवार यांना विचारला पाहीजे. शरद पवारांनी आपल्या हयातीत किती कुटुंब फोडली? किती कुटुंबाची धुळधाण उडवली? किती जणांचे राजकीय करिअर उद्धवस्त केले? हे सर्व प्रश्न त्यांनी शरद पवारांना विचारले पाहीजे. त्याची उत्तर मिळाल्यानंतर ते अशी टिका करणार नाहीत असेही विखे पाटील यांनी सांगितले.
विखे - पवार जुने राजकीय वैर
पवार आणि विखे पाटील हे जुने राजकीय वैर आहे. शरद पवारांनी बाळासाहेब विखे पाटील यांना नेहमीच विरोध केला आहे. अहमदनगरच्या राजकारणात विखे-पाटील यांचे नेहमीच वर्चस्व राहीले आहे. यावर्चस्वाला सुरूंग लावण्याचे काम शरद पवारांनी वारंवार केल्याचा त्यांच्यावर आरोप होतो. शरद पवारांमुळेच बाळासाहेब विखे पाटील हे शिवसेनेत गेले होते. त्यांतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले. या लोकसभा निवडणुकीतही राधाकृष्ण विखे पाटील यांचे पत्र सुजय विखे पाटील यांचा शरद पवारांच्याच उमेदवाराने पराभव केला आहे.