जाहिरात

Raigad News: गोगावले- थोरवेंना घेरण्यासाठी तटकरेंची नवी खेळी, कट्टर विरोधकांना दिली मोठी जबाबदारी

या दोन्ही नेत्यांना पक्षामध्ये घेऊन बळ देण्याचे काम सुनील तटकरे यांनी केले आहे.

Raigad News: गोगावले- थोरवेंना घेरण्यासाठी तटकरेंची नवी खेळी, कट्टर विरोधकांना दिली मोठी जबाबदारी
रायगड:

खासदार सुनिल तटकरे यांनी जिल्ह्यातील आपल्या विरोधकांना घेरण्यासाठी नवी खेळी केली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून नेहमीच तटकरे यांना लक्ष्य केलं जातं. त्यात मंत्री असलेले भरत गोगावले आणि दुसरे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे हे आघाडीवर असतात. आता त्यांच्याच मतदार संघातील त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या नेत्यांना तटकरे यांनी ताकद दिली आहे. त्यानुसार कर्जतच्या सुधाकर घारे यांना रायगड जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर महाडमध्ये हनुमंत जगताप यांना प्रदेश सरचिटणिस करण्यात आले आहे. हे दोघे ही गोगावले आणि थोरवे यांचे कट्टर विरोधक समजले जातात. 

सुधाकर घारे हे कर्जतमधील नेते आहेत. शिवाय त्यांनी जिल्हापरिषदेच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली आहे. मागील विधानसभा निवडणूक ते कर्जत मतदार संघातून अपक्ष म्हणून लढले होते. त्यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि सुनिल तटकरे यांना ताकद दिली होती असं बोललं जातं. या निवडणुकीत घारे यांचा केवळ पाच हजाराच्या फरकाने पराभव झाला होता. शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांना निसटता विजय मिळाला होता. घारे हे सुनील तटकरे यांचे कट्टर समर्थक समजले जातात. शिवाय आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर विरोधक म्हणून त्याची जिल्ह्यात ओळख आहे. याच घारे यांना आता रायगड जिल्हाध्यक्ष करण्यात आले आहे. 

नक्की वाचा - Ladki Bhahin Yojana: लाडक्या बहीण योजनेतून आता 26 लाख लाडक्या बहीणी आऊट, दिलं 'हे' कारण

तर महाडचे हनुमंत जगताप यांची प्रदेश सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. फालोत्पादन व रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांचे ते कट्टर विरोधक समजले जातात. जगताप यांची गोगावले यांच्या महाड मतदार संघात मोठी ताकद आहे. महाडचे माजी आमदार माणिक जगताप यांचे ते सख्खे भाऊ आहेत. महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांचे ते सख्खे काका  आहेत. हनुमंत जगताप यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना त्या माध्यमातून ताकद देण्याचे काम तटकरे यांनी केले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर स्नेहल जगताप व हनुमंत जगताप यांनी उबाटा मधून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता. 

नक्की वाचा - Success Story: घरातलं काम केलं, मुलंही सांभाळली, पतीच्या पाठिंब्याने पहिल्याच प्रयत्नात UGC NET क्रॅक केली

या दोन्ही नेत्यांना पक्षामध्ये घेऊन बळ देण्याचे काम सुनील तटकरे यांनी केले आहे. रायगड जिल्ह्यातील शिंदे गटाचे तीन आमदार आहेत. त्यात महेंद्र थोरवे आणि भरत गोगावले हे जिल्ह्याच्या राजकारणात अधिक सक्रीय आहेत. त्यांनाच आता त्याच्या मतदार संघात अडकवून ठेवण्याचे काम तटकरेंनी केले आहे. हे दोन्ही नेते स्थानिक पातळीवर गोगावले आणि थोरवे यांचे कट्टर विरोधक मानले जातात.   

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com