जाहिरात

BMC निवडणुकीआधी राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर, पक्षसंघटनेत मोठे बदल; मुंबईची जबाबदारी कोणाकडे?

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे कामाला लागले आहेत.

BMC निवडणुकीआधी राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर, पक्षसंघटनेत मोठे बदल; मुंबईची जबाबदारी कोणाकडे?

Mumbai Municipal Corporation Elections : लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या घोषणेची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तयारीला लागली आहे. महापालिका निवडणुकीच्या धर्तीवर मुंबईत मनसेच्या नव्या पदांच्या रचनेची घोषणा करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे कामाला लागले आहेत. अद्याप मुंबई महापालिकेची घोषणा झालेली नाही, तरी पक्ष संघटना आणि बळकटीसाठी मनसे अधिक लक्ष देत असल्याचं दिसतंय. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कोणत्याही निवडणुकीसाठी पक्षबांधणी आणि संघटना महत्त्वाची भूमिका निभावते. त्यामुळे निवडणुकीपूर्वी मनसेकडून कामाचं वाटप करण्यात आलं आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसेचे संदीप देशपांडे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.  देशपांडे यांची मनसे मुंबई अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संंदीप देशपांडे यांनी मुंबईतील मराठीच्या मुद्दावरुन थेट भूमिका घेतली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मनसे मराठी विरुद्ध अमराठी वाद अग्रणी ठेवण्याची शक्यता आहे. त्याशिवाय मुंबईतील विभाग अध्यक्ष यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय समिती यांचे नेतृत्व नितीन सरदेसाई करणार आहेत. विधानसभेत सपाटून अपयश आलेल्या अमित ठाकरेंकडे मनसेने शाखाध्यक्षांची जबाबदारी सोपवली आहे. याशिवाय गटाध्यक्ष केंद्रीय समिती निवड बाळा नांदगावकर यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

Sanjay Raut rokhthok : 'नागपूर हिंसाचार फडणवीसांच्या बदनामीसाठी', संजय राऊतांच्या विधानाने खळबळ

नक्की वाचा - Sanjay Raut rokhthok : 'नागपूर हिंसाचार फडणवीसांच्या बदनामीसाठी', संजय राऊतांच्या विधानाने खळबळ

यंदाच्या गुढीपाडव्याला काय बोलणार?
30 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या मेळाव्याला राज ठाकरे कोणत्या मुद्द्यांवरुन जनतेशी संवाद साधणार याकडे सर्वांचच लक्ष आहे. या भाषणातील ते ज्या मुद्द्यांवर बोलतील त्यावरुन महापालिका निवडणुकीत त्यांची दिशा नेमकी काय असेल हे स्पष्ट होईल. सध्या औरंगजेबाच्या कबरीवरुन वादंग सुरू असताना ते नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.