'मला एक खून माफ करा' राज ठाकरेंना कोणाचा करायचाय खून? ऐकून तुम्ही म्हणाल...

राज ठाकरे यांनी जाहीर व्यासपीठावरून खून करण्याची भाषा केली. राज याबाबत बोलत असताना कार्यकर्ते सुरूवातीला बघतच राहीले.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या. त्यांनी जाहीर व्यासपीठावरून खून करण्याची भाषा केली. राज याबाबत बोलत असताना कार्यकर्ते सुरूवातीला बघतच राहीले. जेव्हा त्यांनी कुणाचा खून करायचा आहे याचा खुलासा केल्यानंतर कार्यकर्त्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला. राज यांनी आपल्याला एक खून माफ करावा असे वक्तव्य केल आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मनसे कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना राज म्हणाले की मी राष्ट्रपतींकडे एक विनंती करणार आहे. मला एक खून माफ करावा. त्यानं तसे केले तर मी कोणाचा खून करेन माहित आहे का? असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना केला. पण कुणी काहीच बोलले नाही. राज थेट जाहीर पणे खूनाची भाषा बोलत होते. त्याच्या दुसऱ्याच क्षणी राज यांनी टायमिंग साधत, ज्याने मोबाईलमध्ये कॅमेरा आणला ना त्याचा मला खून करायाच आहे असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याने मेळाव्यात एक हंशा पिकला. सर्वच जण खळखळून हसले. 

ट्रेंडिंग बातमी - ना युती ना आघाडी! राज यांची घोषणा काय? ठाकरेंच्या भाषणातले 5 ठळक मुद्दे

मोबाईलमध्ये कॅमेरा आणणाऱ्याचा खून का करायचा आहे याचा ही पुढे राज यांनी खुलासा केला. नुकताच आपण महाराष्ट्र दौरा केला. त्यावेळी सगळ्यांना माझ्या बरोबर फोटो काढायचे होते. प्रत्येकाला फोटो देणे शक्य नव्हते. त्यात फोटो काढण्यासाठी मोबाईलचा कॅमेरा कोणीही कुठेही धरत होता. एकाने थेट तोंडात कॅमेरा घुसवला. बरं फोटो कुठेही आणि कधी ही काढले जातात. हे कधी थांबणार आहे की नाही असा प्रश्नही राज यांनी केला. फोटो काढणे हा एक आजार आहे असेही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - Baba Siddique बाबा सिद्दीकींच्या हत्येसाठी कितीची सुपारी? प्रत्येकाला मिळणार होते...

याचा मला प्रचंड त्रास झाला. शिवाय इतरानाही त्याचा त्रास होतो असेही ते म्हणाले. त्यामुळे फोटो वैगरे ठिक आहे पण ते टाळा असे राज यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले. दरम्यान राजकारणात सरळ सभ्य प्रामणिक माणूस का चालत नाही अशी विचारणा त्यांनी केला. गद्दारी करणारे लोकांना का आवडतात? याचा विचार एकदा होणे गरजेचे आहे असेही राज यावेळी म्हणाले. राज्याला प्रामाणिक सभ्य राजकारणी हवा की नको असा प्रश्नही त्यांनी या वेळी केला. त्यामुळे यावेळी निवडणुकीत योग्य निर्णय घ्या. तसे तुम्ही केले नाही तर महाराष्ट्र बरबाद झाल्या शिवाय रहाणार नाही असे ते म्हणाले.