मुख्यमंत्र्यांना मुस्लिम तरुणांनी दाखवले काळे झेंडे, बुलडाण्यात जबरदस्त ड्रामा

बुलडाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
बुलढाणा:

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी बुलडाण्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांना मुस्लिम समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्याचा मुस्लिम समाजामध्ये राग असून तो राग व्यक्त करण्यासाठी मुस्लिम समाजातील युवकांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. रामगिरी महाराजारांनी केलेल्या विधानामुळे छत्रपती संभाजीनगर, नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी तणावाचा वातावरण निर्माण झाले होते. मुस्लिम समाजाने रामगिरी महाराजांवर कारवाई करावी अशी सातत्याने मागणी केली आहे. 

दोन्ही उपमुख्यमंत्रीही मुख्यमंत्र्यांसह उपस्थित

बुलडाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री  हे बुलडाण्यात आले आहेत. या तिघांची एका गाडीतून मिरवणूक काढण्यात आली होती. लोकांनी या तिघांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. तीनही पक्षांचे कार्यकर्ते या तिघांवर फुलांची उधळण करत होते. त्याचवेळी मुस्लिम समाजातील युवकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे या तरुणांकडे लक्ष वेधले गेले होते असे सांगण्यात येत आहे. 

रामगिरी महाराजांविरोधात ठिकठिकाणी गुन्हे दाखल 

वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सरला गोवर्धनचे मठाधिपती रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांच्यावर विविध भागांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्याविरोधात पुण्यामध्येही गुन्हा दाखल करण्यात आला होता.  सामाजिक भावना दुखावल्या प्रकरणी रामगिरी महाराजांविरुद्ध पुण्यातील खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता तर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य करून सामाजिक भावना दुखावल्याप्रकरणी रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.  शोएब इस्माईल शेख (वय 62, रा. घोरपडे पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्याआधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामगिरी महाराज यांनी जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य करून त्याचे चित्रीकरण सोशल मीडियावर प्रसारित केले. त्यामुळे इतर समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी रामगिरी महाराज यांच्यावर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, मुंबई येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

Topics mentioned in this article