नवी मुंबईत शिवसेना शिंदे गटाचे दोन ठराव, निवडणुकीच्या तोंडावर वाद चव्हाट्यावर

नवी मुंबईतल्या दोन विधानसभां पैकी एक विधानसभा मतदार संघ शिवसेना शिंदे गटाला मिळावा असा ठराव करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी मुंबई:

विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. सर्वच पक्षा निवडणुकीच्या तयारीत गुंतले आहेत. वरिष्ठ पातळीवर आघाडी आणि महायुती असली तरी स्थानिक पातळीवर अजूनही कार्यकर्त्यांची मने काही जुळलेली दिसत नाहीत. नवी मुंबईतही अशीच काही स्थिती असल्याचे दिसून येत आहे. नवी मुंबईतल्या दोन विधानसभां पैकी एक विधानसभा मतदार संघ शिवसेना शिंदे गटाला मिळावा असा ठराव करण्यात आला आहे. तसे न झाल्यास शिवसैनिक वेगळा विचार करतील असाही ठराव करण्यात आला आहे. तो ठराव एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आला आहे. त्यामुळे नवी मुंबईत महायुतीतलं वातावरण चांगलचं तापलं आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नवी मुंबईमध्ये ऐरोली आणि बेलापूर हे दोन विधानसभा मतदार संघ आहेत. या दोन ही मतदार संघात भाजपचे आमदार सध्या आहेत. अशा स्थितीत नवी मुंबई शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत शिवसेना शिंदे गटाला नवी मुंबईतली एक जागा मिळावी अशी मागणी करण्यात आली. या बैठकीत दोन ठराव करण्यात आले. त्या दोन पैकी एक मतदार संघ मिळाला असा पहिला ठराव होता. तर घराणेशाहीला उमेदवारी मिळाली तर त्या विरोधात उभे राहण्याची भूमीकाही मांडण्यात आली. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या चिन्हात बदल; निवडणूक आयोगाने 'ती' मागणी फेटाळली

ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदार संघात नाईक कुटुंबाला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसे झाल्यास  आम्ही काय बांगड्या भरल्या नाहीत, वेळ आली तर विरोधात उभे राहण्याचा इशारा विजय चौगुले यांनी दिला आहे. वेळ आल्यास शिवसैनिक अपक्ष म्हणून मैदानात उतरेल असा ही ठराव करण्यात आला आहे. हा ठराव एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे दोन ही ठराव एक मतांनी मंजूर करण्यात आल्याचे विजय चौगुले यांनी स्पष्ट केले आहे. 

Advertisement

(नक्की वाचा- Maharashtra Election 2024 : विधानसभेचं बिगुल वाजलं! तुमच्या मतदारसंघात मतदान आणि मतमोजणी कधी? वाचा वेळापत्रक)

नवी मुंबई हा गणेश नाईक यांचा गड राहीला आहे. इथे नाईक विरूद्ध शिवसेना असा संघर्ष राहीला आहे. त्यात बेलापूर विधानसभेतून मंदा म्हात्रे या आमदार आहेत. त्यांची जागा ही नाईक कुटुंबातील सदस्याला मिळावी असे प्रयत्न आहे. ऐरोलीतून स्वत: गणेश नाईक हे आमदार आहेत. अशा स्थिती या दोन्ही जागां वर भाजपचाच दावा आहे. मात्र शिवसेना शिंदे गटाला त्या पैकी एक जागा हवी आहे. तसे न झाल्यास अपक्ष लढण्याचा हा विचार केला जात आहे. नुकताच विजय नाहाटा यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यात आता विजय चौगुलेही वेगळा विचार करत आहेत. तसे झाल्यास शिंदे गटासाठी तो मोठा धक्का असेल.      

Advertisement