लोकसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा फटका बसला होता. पिपाणी आणि तुतारी चिन्हातील साम्यामुळे शरद पवार गटाच्या उमेदवारांच्या मतदानावर परिणाम झाला होता. सातारा लोकसभेची जागा तर याच घोळामुळे शरद पवार गटाच्या हातून निसटली. विधानसभा निवडणुकीत याचा पुन्हा फटका बसू नये यासाठी शरद पवार गटाने पिपाणी चिन्ही गोठवण्याची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र निवडणूक आयोगाने शरद पवार गटाची ही मागणी फेटाळली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शरद पवार गटाच्या चिन्हात बदल
केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं की, शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे दोन मागण्या केल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह देण्यात आलं होते. मात्र शरद पवार गटाची तक्रार होती की, हे चिन्ह मतपत्रिकेवर छोटं दिसतं. याची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. तुतारी चिन्ह त्यांनी केलेल्या सूचनेनुसार आता दिसेल. त्यांनी सांगितलेला आकार आम्ही मान्य केला आहे, असं निवडणूक मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं.
(नक्की वाचा- पेजर ब्लास्ट होतो मग EVM ही हॅक होऊ शकतं? निवडणूक आयुक्तांनी असं समजावलं की कायमचं लक्षात राहील)
तर पिपाणी (Trumpet) चिन्ह गोठवण्याची दुसरी मागणी शरद पवार गटाने केली होती. बॅलेट युनिटमधील पिपाणी चिन्ह आणि तुतारी वाजवणारा माणूस या दोन्ही चिन्हात फरक आहे, असं म्हणत राजीव कुमार यांनी पिपाणी चिन्ह गोठवण्याची शरद पवार गटाची मागणी फेटाळली आहे.
(नक्की वाचा- Maharashtra Election 2024 : विधानसभेचं बिगुल वाजलं! तुमच्या मतदारसंघात मतदान आणि मतमोजणी कधी? वाचा वेळापत्रक)
कसं असेल निवडणुकीचं वेळापत्रक?
महाराष्ट्रात 20 नोेव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.
- अर्ज भरण्याची मुदत - 29 ऑक्टोबर 2024
- अर्जाची छाननी - 30 ऑक्टोबर 2024
- अर्ज माघारीची मुदत- 4 नोव्हेंबर 2024
- मतदान - 20 नोव्हेंबर 2024
- मतमोजणी- 23 नोव्हेंबर 2024
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world