जाहिरात
Story ProgressBack

'प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील', शरद पवारांचं मोठं वक्तव्य

शरद पवारांची राष्ट्रवादीही काँग्रेसमध्ये विलीन होणार का? प्रादेशिक पक्षाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य

Read Time: 2 min
'प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील', शरद पवारांचं मोठं वक्तव्य
मुंबई:

2024 च्या निवडणुकीनंतर विरोधी पक्षांच्या राजकारणासाठी प्रादेशिक पक्षांना काँग्रेससोबत तर काही प्रकरणात काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल, असं वक्तव्य शरद पवारांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

गेल्या काही वर्षात विविध राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांचं भविष्य धोक्यात आल्याची चर्चा सुरू आहे.  भाजपकडून प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा आरोप अनेक नेत्यांकडून केला जात असताना प्रादेशिक पक्षांच्या वाढीसाठी शरद पवारांचं वक्तव्य महत्त्वपूर्ण ठरत आहे. 

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार पुढे म्हणाले, येत्या काही वर्षात काही प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत अधिक संलग्नपणे काम करतील. त्याशिवाय पक्षाच्या भवितव्याचा विचार करून काही वेळा काँग्रेससोबत विलीन होण्याच्या पर्यायाचा विचार केला जाईल. समविचारी लोकांसोबत काम करण्यासाठी उद्धव ठाकरेही सकारात्मक आहेत.

भविष्यात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार का? या प्रश्नावर उत्तर देताना पवार म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षांमध्ये कोणताही फरक असल्याचं मला वाटत नाही. आम्ही गांधी, नेहरू या विचारसरणीचे आहोत. याला जोडूनच ते म्हणाले, मी आता काहीच सांगत नाहीये.. माझ्या सहयोगींशी सल्लामसलत केल्याशिवाय मी काहीच सांगू शकत नाही. आम्ही काँग्रेसच्या विचारसरणीच्या जवळ आहोत. त्यामुळे भविष्याचा विचार एकत्र येऊन केला जाईल. मात्र मोदींसोबत जुळवून घेणं कठीण आहे. 

नक्की वाचा - "...तर मी देखील तुमच्यासाठी धावून येईन"; भरसभेत उद्धव ठाकरेंचा PM मोदींना शब्द

सध्या देशभरातील अनेक प्रादेशिक पक्षांचं संक्रमण होत असून हा वारसा एक पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असताना प्रादेशिक पक्षांबद्दल शरद पवारांचं वक्तव्य महत्त्वपूर्ण ठरत आहे. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी मोदींबद्दल वक्तव्य केलं. ते म्हणाले, देशाचा मुड मोदींच्या विरोधात जात आहे. गांधी आणि नेहरूंच्या पथपदावर जाताना आम्ही सकारात्मक मार्गाने जात आहोत. 2024 आणि 2019 निवडणुकीची तुलना करताना ते पुढे म्हणाले, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत तरुणांचा विरोधी पक्षांमधील सहभाग वाढला आहे.  

पवार म्हणाले की, ही परिस्थिती 1977 मधील जनता पक्षासारखी होऊ शकते. यावेळी निवडणुका जाहीर झाल्यानंतर जनता पक्षाची स्थापना झाली. यासाठी वेगवेगळ्या पक्ष एकत्र आले आणि त्यांनी सरकार स्थापन केलं होतं.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination