जाहिरात
This Article is From Apr 04, 2024

ती' चूक संजय निरूपमांना भोवली, पक्षानं केली मोठी कारवाई

ती' चूक संजय निरूपमांना भोवली, पक्षानं केली मोठी कारवाई
Mumbai:

काँग्रेस नेते माजी खासदार संजय निरूपम यांच्यावर अखेर काँग्रेसनं मोठी कारवाई केली आहे. संजय निरूपम हे सतत मित्र पक्षावर तसेच काँग्रेस नेतृत्वार टिका करत होते. त्यांना त्याबाबत सबुरीनं घेण्याचा सल्लाही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिला होता. मात्र त्यानंतरही त्यांनी टिकेची झोड सुरूच ठेवली. शिवाय ते मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत होते. त्या आधीच काँग्रेसनं त्यांच्यावर कारवाई करत सहा वर्षासाठी पक्षातून हाकालपट्टी केली आहे.  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल यांच्या स्वाक्षरीचं पत्र जारी करण्यात आलं आहे. त्यात सहा वर्षांसाठी पक्षातून संजय निरुपम यांची हकालपट्टी केल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.


संजय निरुपम यांच्यावर कारवाई
पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत अखिल भारतीय काँग्रेस समितीने, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. सहा वर्षांसाठी ही कारवाई असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. तसेच प्रदेश काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतूनही त्यांचे नावही काढून टाकण्यात आले आहे.

निरुपम निर्णय घेण्यापूर्वीच कारवाई
उत्तर पश्चिम मतदारसंघ काँग्रेसला मिळण्याची शक्यता दुरावल्यामुळे निरुपम हे पक्षाचा राजीनामा देणार होते. त्यापूर्वीच काँग्रेसने कारवाई केली. कोणत्याच पक्षाने त्यांना उमेदवारीचे आश्वासन दिलेले नाही. त्यामुळे ते कोठे जातात याची उत्सुकता आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका चॅनलवरच्या मुलाखतीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. त्यामुळे संजय निरुपम भाजपात जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.


निरूपम शिंदेंच्या संपर्कात? 
उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघ हा शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आहे. इथून उमेदवारी मिळावी, असा निरुपम यांचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र उमेदवारीबाबत आश्वासन दिले नव्हते. ‘निरुपम यांनी प्रवेश केल्यास त्यांचे स्वागतच आहे. त्यांना उमेदवारी देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्णय घेतील असे शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले. निरुपम यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठीही प्रयत्न सुरू ठेवले आहेत. पण उमेदवारीबाबत त्यांना कोणत्याच पक्षाने आश्वासन दिलेले नाही.

संजय निरूपम यांच्या पुढे पर्याय काय? 
संजय निरुपम हे काँग्रेसचे मुंबईतील आक्रमक नेते म्हणून ओळखले जात होते. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. संजय निरुपम एकेकाळी शिवसेनेत होते. त्यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसनं त्यांना खासदारकीही दिली होती. या निवडणूकीतही त्यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती.  काँग्रेसच्या स्टार प्रचारक नेत्यांच्या यादीत ते होते. पण उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने अमोल किर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर संजय निरुपम यांनी खूप आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली होती. आता सहा वर्षांसाठी त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप असे दोन पर्याय त्यांच्यासाठी खुले आहेत.  त्यामुळे ते आता पुढे काय करतात याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
'मला एक खून माफ करा' राज ठाकरेंना कोणाचा करायचाय खून? ऐकून तुम्ही म्हणाल...
ती' चूक संजय निरूपमांना भोवली, पक्षानं केली मोठी कारवाई
ncp-to-field-highest-number-of-candidates-in-mumbai-vidhansabha-elections
Next Article
महायुती मुंबईत वापरणार 'मुस्लीम कार्ड', विधानसभा निवडणुकीत 'या' जागांवर देणार उमेदवार