जाहिरात

Jalgaon News: 'तो' विवाहसोहळा गाजला! संजय राऊत अन् गुलाबराव पाटील आमनेसामने आले, पुढं काय घडलं? पाहा Video

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे एका विवाह सोहळ्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. शिवसेना (UBT) चे खासदार संजय राऊत आणि शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील या विवाहसोहळ्यात आमनेसामने आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

Jalgaon News: 'तो' विवाहसोहळा गाजला! संजय राऊत अन् गुलाबराव पाटील आमनेसामने आले, पुढं काय घडलं? पाहा Video
Sanjay Raut And Gulabrao Patil Video

मंगेश जोशी, प्रतिनिधी 

Sanjay Raut And Gulabrao Patil Video Viral : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे एका विवाह सोहळ्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. शिवसेना (UBT) चे खासदार संजय राऊत आणि शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील या विवाहसोहळ्यात आमनेसामने आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. या नेत्यांची अचानक झालेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. धरणगाव येथे शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते गुलाबराव वाघ यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात संजय राऊत तसेच गुलाबराव पाटील आमने-सामने आले विशेष म्हणजे शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर प्रथमच हे दोन्हीही नेते विवाह सोहळ्यानिमित्त एकाच मंचावर दिसल्याने या विवाह सोहळ्याला राजकीय नाट्याची किनारही लाभली. राऊत आणि पाटलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कट्टर प्रतिस्पर्धी समोरासमोर आल्याने दोन्हीही नेत्यांनी विवाह सोहळ्यात एकमेकांना लांबूनच नमस्कार करत औपचारिकता पूर्ण केली पण भेटीगाठी दरम्यान पुन्हा दोन्हीही नेते समोरासमोर आले आणि त्यावेळी दोघांमध्ये झालेले हस्तांदोलन या विवाह सोहळ्यात हे लक्ष विधी ठरले विशेष म्हणजे संजय राऊत यांनी गुलाबराव पाटलांच्या पाठीवरही थाप दिली.

गुलाबराव पाटलांवर टीका करताना एकही संधी न सोडणाऱ्या संजय राऊत यांनी गुलाबराव पाटलांच्या पाठीवर दिलेली थाप हे विवाह सोहळ्यातील उपस्थितांमध्येच नव्हे तर राजकीय वर्तुळातही आश्चर्य व्यक्त करणारी ठरली. तर या प्रसंगाची खरीरंगत ही विवाह सोहळ्यात झालेल्या भाषणादरम्यान पाहायला मिळाली यावेळी खासदार संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांचा सौजन्यपूर्व केलेला पालकमंत्री म्हणून उल्लेख व त्यानंतर गुलाबराव पाटलांनी आपल्या भाषणातून आमची नेते म्हणून संजय राऊत यांचा केलेला उल्लेख राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला. 

राजकीय वैरानंतर विवाह सोहळ्यात झालेली भेट लक्षवेधी ठरली

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर संजय राऊत यांनी वारंवार गुलाबराव पाटलांना लक्ष करत गद्दार, फळकुटे, पान टपरी वाला अशा शब्दात कायम टीका केली. गुलाबराव पाटलांनीही पक्षफुटी नंतर उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना मर्यादा बाळगल्याचे कायम पाहायला मिळाले मात्र संजय रावतांवर टीका करताना गुलाबराव पाटलांनी कायम आपली कमान ही तेज ठेवली.

इथे पाहा संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांचा व्हिडीओ

शिवसेना मध्ये फूट पडण्यासाठी संजय राऊत हे जबाबदार असल्याचा आरोपही गुलाबराव पाटलांनी अनेकदा आपल्या भाषणातून केला तसेच नगरसेवक होण्याची पात्रता नसताना आमच्या मतावर संजय राऊत हे खासदार झाल्याचे म्हणत संजय राऊत यांच्या राजकीय क्षमतेवरही अनेकदा प्रश्न उपस्थित केले. त्यामुळेच राज्यातील राजकारणात या दोन्हीही नेत्यांचे राजकीय वैर हे अत्यंत कट्टर मानले जाते. पण याच राजकीय वैरानंतरची विवाह सोहळ्यात झालेली सौजन्य पूर्ण भेट ही लक्षवेधी ठरली.  राजकीय वर्तुळात रंगली चर्चा 

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी सुरू आहेत, फूट पडलेल्या पक्षांमध्ये विलीनीकरण दिग्गजांचे या त्या पक्षात होत असलेले प्रवेश आरोप प्रत्यारोपावरून सुरू असलेलं राजकारण अशा दररोज नवनवीन घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत त्यातच दोन्हीही कट्टर राजकीय नेते विवाह सोहळ्यानिमित्त आमने-सामने आल्याने हा फक्त योगायोग की राज्याच्या बदलत्या राजकारणाचे समीकरण? असे अनेक प्रश्न या निमित्ताने राजकीय वर्तुळात उपस्थित केले जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com