लोकसभा निवडणुकीतल्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा विश्वास दुणावला आहेत. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. त्यात आता या सरकारचे शेवटचे अधिवेश होत आहे. या अधिवेशनात मविआने सरकारला घेरण्याची तयारी सुरू केली असतानाच खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केले आहे. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्या पूर्वी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा करावी अशी मागणीच त्यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे मविआचे मित्रपक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने हीत्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून आघाडीत बिघाडी होते का? याचीच चर्चा सध्या सुरू झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्या शिवाय निवडणुकीला सामोरे जाणे धोक्याचे आहे असे स्पष्ट मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. महाविकास आघाडीला जे लोकसभेला यश मिळाले ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामुळेच मिळाले असेही त्यांनी सांगितले. बिन चेहऱ्याचे सरकार अजिबात चालणार नाही असेही ते म्हणाले. त्यामुळे मविआने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषीत करावे अशी मागणी त्यांनी केली. शिवाय महाराष्ट्रानं मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं काम पाहिलं आहे असेही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - Live Update : देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री अन् विरोधकांची घोषणाबाजी
काँग्रेस- राष्ट्रवादीची प्रतिक्रिया काय?
संजय राऊत यांच्या या मागणीचे पडसाद लगेचच महाविकास आघाडीत उमटले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याबाबत थेट बोलले आहेत. महायुतीला हरवणे हे आमचे पहिले लक्ष्य आहे. महायुतीला सत्तेवरून खाली खेचू. सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री कोण असेल हे आम्ही बसून ठरवू असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.तर महाविकास आघाडीची एकत्रीत बैठक होईल. या बैठकीत मुख्यमंत्री कोण असणार हे ठरवले जाईल असे विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मुख्यमंत्रपदाचा उमदेवार जाहीर करण्याला काँग्रेस राष्ट्रवादीने एक प्रकारे विरोध केला आहे. जो निर्णय असेल तो चर्चा करून घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेचे आमदार काय म्हणाले?
संजय राऊत यांच्या या मागणीनंतर शिवसेनेचे आमदारही आक्रमक झाले आहेत. आमदार वैभव नाईक यांनी उद्धव ठाकरे यांना भावी मुख्यमंत्री म्हटले आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूका लढल्या जातील. मुख्यमंत्रीपदाचा चेहराहा उद्धव ठाकरे असतील असेही त्यांनी स्पष्ट केले. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सध्या मुख्यमंत्री कोण हा विषय महत्वाचा नाही असे सांगितले. शिवाय याबाबतचा निर्णय मविआच्या बैठकीत घेतला जाईल अशी सावध भूमीका घेतली.