आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनला (Monsoon Session) सुरुवात होत आहे. 27 जून ते 13 जुलैपर्यंत हे अधिवेशन सुरू राहणार आहे. यंदाचं अधिवेशन वादळी ठरणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अधिवेशनच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर टीकास्त्र सोडलं. यावेळी चहापानाच्या कार्यक्रमालाही विरोधकांनी बहिष्कार टाकला.
नियम तोडणाऱ्या दारुड्या नागरिकाला 3 वाहतूक अंमलदारांकडून बेदम मारहाण
छत्रपती संभाजीनगर शहरात नियम तोडणाऱ्या दारुड्या नागरिकाला तीन वाहतूक अंमलदारांनी बेदम मारहाण केली आहे. ही घटना औद्योगिक परिसरात एनआरबी चौकात काल सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान घडली आहे. विरुद्ध दिशेने जात असताना पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला थांबायला सांगितलं मात्र त्यांनी पोलिसाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यावर आहे..
शिंदे सरकार उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार, लोकप्रिय घोषणांची शक्यता
शिंदे सरकार उद्या 28 जून रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. ह्या अर्थसंकल्पात काही लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यापैकीच घोषणा म्हणजे लाडकी बहीण योजना आणि मुलींना पदवीपर्यंत शिक्षण मोफत देण्याची. पण दुसऱ्या बाजुला चर्चा सुरु आहे अजित पवारांची. अर्थमंत्री म्हणून त्यांनी काही अडचणी व्यक्त केल्याचं समजतंय. त्यावरच आता नरेटीव्हची लढाई सुरु झाली आहे.
चंद्रकांत पाटील मलाही भेटायला आले होते - नाना पटोले
...तर आम्ही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा समोर आणू : उद्धव ठाकरे
लोकसभेच्या अपयशाचा चेहरा कोण, हे महायुतीने जाहीर करावं. त्यानंतर आम्ही मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा समोर आणू - उद्धव ठाकरे
'लाडकी बहीण योजनेप्रमाणे मुलांनाही मदत करीत लाडका भाऊ योजना आणा'
मी मुख्यमंत्री असताना दोन लाखांपर्यंत पिक कर्जाची रक्कम माफ केली होती. त्यानुसार तत्काळ सरकारने शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी. लाडकी बहीण योजना आणा आणि मुलींप्रमाणे मुलांनाही मदत करीत लाडका भाऊ ही योजनाही आणा - उद्धव ठाकरे
'शेतकरी हेलिकॉप्टरने शेतात जातो आणि पंचतारांकित शेती करतो'
शेतकरी हेलिकॉप्टरने शेतात जातो आणि पंचतारांकित शेती करतो, उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंचं नाव न घेता निशाणा
सरकारच्या निरोपाचं अधिवेशन - उद्धव ठाकरे
सभागृहाचं कामकाज तहकूब झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद सुरू झालं आहे.
धरणग्रस्तांचे प्रलंबित मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन
धरणग्रस्तांचे प्रलंबित मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन
उजनी कण्हेर धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यासाठी आज पंढरपूर तहसील कार्यालयासमोर श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. धरणग्रस्तांच्या मागण्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. यासाठी कुठलाही धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज नाही. फक्त निर्णयाची अंमलबजावणी करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा श्रमिक मुक्तदानाचे जिल्हाध्यक्ष मोहन अनपट यांनी दिला.
निफ्टीने 24 हजाराची पातळी ओलांडली, सेन्सेक्सही 79 हजारांच्या पार
राष्ट्रीय शेअर बाजारचा निर्देशांक निफ्टीने काही वेळापूर्वी 24 हजाराची पातळी ओलांडली आहे. जानेवारी 2024 पासून आजपर्यंत निफ्टीने 35 वेळा नवा उच्चांक गाठला आहे. सेन्सेक्सही 79 हजाराची पातळी ओलांडली. अवघ्या दीड सत्रात 1000 अंकाने उसळला.
Live Update : आजच्या दिवसाचं दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब
Live Update : आजच्या दिवसाचं दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब
विधानपरिषदेच्या कामकाजाला सुरुवात...
विधानपरिषदेच्या कामकाजाला सुरुवात...
राज्यातील विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन LIVE पाहा
राज्यातील विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पाहण्यासाठी क्लिक करा...
संसदेत राष्ट्रपती दौपद्री मुर्मू यांचं अभिभाषण सुरू
आज संसदेचं कामकाज सुरू झालं असून राष्ट्रपती दौपद्री मुर्मू यांचं अभिभाषण सुरू आहे
सीबीआयकडून केजरीवाल यांच्या अटकेविषयी संजय राऊत काय म्हणाले?
#WATCH दिल्ली: शिवसेना (UBT) नेता संजय राउत ने कहा, "केजरीवाल जी को जिस प्रकार से फिर एक बार जमानत मिलने के बाद भी CBI ने गिरफ्तार किया ये आपातकाल से भी ऊपर तानाशाही हो गई और हम सब लोग संसद में इस बारे में सवाल पूछेंगे।
— ANI_HindiNews (@AHindinews) June 27, 2024
AAP द्वारा राष्ट्रपति के अभिभाषण का बहिष्कार करने पर… pic.twitter.com/LGLHJgMWq5
उद्धव ठाकरे विधिमंडळात दाखल
उद्धव ठाकरे विधिमंडळात दाखल झाले आहेत. त्यांचं विधानभवनात आमदारांकडून स्वागत करण्यात आलं आहे.
देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री अन् विरोधकांची घोषणाबाजी
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधक विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवनात दाखल झाले आहेत. त्याचवेळी विरोधी पक्षांकडून घोषणाबाजी सुरू होती.
महाराष्ट्रचे भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच, आमदार वैभव नाईकांचा दावा
उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार आहेत. लोकसभेतील 31 जागा उद्धव ठाकरेंमुळे निवडून आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रचे भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील, असा दावा आमदार वैभव नाईक यांच्याकडून करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार विधिमंडळात दाखल...
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करा, राऊतांच्या या मागणीमुळे नव्या चर्चेला उधाण
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करा, राऊतांच्या या मागणीमुळे नव्या चर्चेला उधाण
सीएमपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं धोक्याचं आहे. मविआला लोकसभेत मिळालेलं यश उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा परिणाम आहे. बिनचेहऱ्याचं सरकार अजिबात चालणार नाही. महाराष्ट्रानं मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं काम पाहिलयं. संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी मोठ्या हालचाली सुरू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यात ड्रग्जचा पुरवठा जबरदस्त, शेतकऱ्यांची खतासाठी वणवण - रोहित पवार
राज्यात ड्रग्जचा पुरवठा जबरदस्त, शेतकऱ्यांची खतासाठी वणवण - रोहित पवार
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले. राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचं रोहित पवार यावेळी म्हणाले. राज्यात ड्रग्ज मुबलक मिळतात, खतं मिळत नाहीत असं म्हणत काही दिवसांपूर्वी पुण्यात घडलेल्या ड्रग्स प्रकरणाबाबत चिंता व्यक्त केली.
विधान परिषदेसाठी 71.87 टक्के मतदान
विधान परिषदेसाठी 71.87 टक्के मतदान
विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक अशा चार मतदारसंघामध्ये 26 जून रोजी मतदान पार पडलं. सायंकाळी सहा वाजेपर्यंत येथे 71.87 टक्के इतके सरासरी मतदान पार पडलं.
सायंकाळी सहा वाजेपर्यंत किती टक्के मतदान
कोकण पदवीधर मतदारसंघ - 63%
मुंबई पदवीधर मतदारसंघ - 56%
मुंबई शिक्षक मतदारसंघ - 75%
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ - 93.48%
काल बहिष्कार घातला, आज काय? यंदाचं पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता
सत्ताधाऱ्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. विरोधकांनी सभागृहाबाहेर गोंधळ घालण्यापेक्षा सभागृहात येऊन चर्चा करावी आणि त्यांच्या खोटे बोलण्याच्या उद्योगाचा पदार्फाश करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.