शिवडी विधानसभा मतदारसंघातील (Aewri Assembly Constituency) यंदाची लढत ही लक्षणीय होणार (Maharashtra Assembly Election 2024) आहे. 23 ऑक्टोबरला शिवसेना (उबाठा) पक्षाने (Shivsena UBT) 65 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये शिवडीचा समावेश नव्हता. यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले होते. या मतदारसंघातील ठाकरेंच्या पक्षाने आपला उमेदवारी निश्चित केला आहे. विद्यमान आमदार अजय चौधरी आणि लालबारचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाचे पदाधिकारी असलेल्या सुधीर साळवी यांच्यात या मतदारसंघासाठी मोठी चुरस होती. सुधीर साळवी यांनी या मतदरासंघातून उमेदवारी मिळावी यासाठी पूर्ण ताकद लावली होती.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिवडी विधानसभेचा तिढा अखेरीस सुटला आहे. शिवडी विधानसभेसाठी विद्यमान आमदार अजय चौधरी (Ajay Choudhari) यांना तिसऱ्यांदा पक्षाकडून संधी देण्यात आली आहे. चौधरी यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आल्याने सुधीर साळवी (Sudhir Salvi) नाराज झाल्याचे बोलले जात आहे. त्यांची नाराजी कायम राहिली तर इथल्या निवडणुकीवर त्याचा काय परिणाम होणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवडी मतदारसंघातून मनसेने बाळा नांदगांवकर यांना याआधीच उमेदवारी जाहीर केली होती. नादगांवकर यांची उमेदवारी फार आधीच जाहीर करण्यात आल्याने त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली होती.
आदित्य ठाकरेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 65 उमेदवारांची नावे जाहीर केली. आदित्य ठाकरे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली असून ते वरळी मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आदित्य ठाकरे यांनी 24 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत अजय चौधरी हे देखील आदित्य यांच्यासोबत ट्रकवर दिसून आले होते. त्यामुळे अजय चौधरींचा उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे संकेत बुधवारी सकाळीच मिळाले होते.
नक्की वाचा : महाविकास आघाडीत फायदा नेमका कोणाला झाला? मित्र पक्षांमधील राजकारणाच्या सुरस कथांनी डोकं गरगरेल
शिवसेना नेते आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेने आदित्य ठाकरेंचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांना वांद्रे पूर्व मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये बहुतांश विद्यमान आमदारांचा समावेश आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world