विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीचा मेळावा मुंबईत षण्मुखानंद सभागृहात झाला. या मेळाव्याला महाविकास आघाडीचे सर्वच मोठे नेते उपस्थित होते. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, संजय राऊत सुप्रिया सुळे हे सर्वच जणांनी यावेळी मार्गदर्शन केले. मेळाव्याची सुरूवात उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने झाली. मुख्यमंत्रिपदाचा उमदेवार जाहीर करा, जे नाव समोर येईल त्याला आपण पाठिंबा देवू असे उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र त्यांच्या या मागणीला शरद पवारांनी प्रतिसाद न देता महायुतीची सत्ता उलथवून लावायची आहे असे आवाहन केले. तर काँग्रेसच्या नाना पटोलेंनी आधी निवडणूक जिंकूनंतर मुख्यमंत्री कोण? ते ठरवू अशी जाहीर भूमिका मांडली. त्यामुळे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री कोण यावरून महाविकास आघाडीत घमासान होण्याची दाट शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंची थेट मागणी
मविआच्या मेळाव्याची सुरूवातच उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने झाली. ठाकरे यांनीही आपल्या शैलीत जोरदार बॅटींग केली. यावेळी त्यांनी थेट मुद्द्यालाच हात घातला. मविआच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा मी होणार की आणि कुणी होणार? हा प्रश्न होता. आता पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार यांनी इथे एक नाव जाहीर करावं. माझा तुमच्या निर्णयाला पाठिंबा असेल. मुख्यमंत्रिपदाबाबत विरोधकांकडून काडी पेटवली जात आहे. आपल्यात मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून वाद लावले जात आहेत. त्यामुळे जे कोणते नाव असेल ते जाहीर करावे असे उद्धव ठाकरे म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - 'मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा', उद्धव ठाकरेंच्या मागणीमागचं राजकारण काय?
शरद पवारांचा मागणीकडे कानाडोळा
उद्धव ठाकरे यांनी मविआच्या व्यासपिठावरून थेट मुख्यमंत्रिपदाच्या विषयाला हात घालण्यात आला. त्यामुळे शरद पवार आणि काँग्रेसचे नेते काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष होते. शरद पवार त्याबाबत काय बोलता याकडेही सर्व जण लक्ष ठेवून होते. शरद पवारांनी महाराष्ट्रवर महायुतीचे संकट आहे. आपल्याला परिवर्तन करायचे आहे. लोकसभेत आपल्याला विरोधकांना रोखण्यात काही प्रमाणात यश आले. पण संविधानावरचं संकट पूर्ण पणे टळलं आहे असं मानता येणार नाही. कारण संध्याचे सरकार हे लोकशाही मानणारे नाही. त्यांना ज्या संवैधानिक संस्था आहेत त्यांचा आदर करता येत नाही. ही त्यांची मानसिकता आहे. मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांचा सन्मान राखला जात नाही. पंतप्रधानानी संसदेचीही प्रतिष्ठा ठेवली नाही असा आरोपही पवारांनी यावेळी केला. मविआमध्ये एकजूट राहीली तर आपला विजय नक्की आहे. महायुती सरकारला सत्तेवरून काही झाले तरी खाली खेचायचे आहे असा आवाहन त्यांनी यावेळी केले. केंद्र सरकारवर हल्ला करताना त्यांनी राज्य सरकारवरही टिका केली. मात्र मुख्यमंत्रिपदाच्या उद्धव ठाकरे यांच्या मागणीवर त्यांनी काही भाष्य केलं नाही. त्याबाबत बोलणं त्यांनी टाळलं.
(नक्की वाचा- Raj Thackeray Movie : राज ठाकरेंची भूमिका साकारणारा 'तो' अभिनेता कोण? रिलीजबाबत हाती आली मोठी अपडेट)
नाना पटोलेंनी थेट भूमिका मांडली
उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र थेट भूमिका मांडली. राज्यावर सध्या महायुतीचे संकट आहे. लोकसभेला आपण त्यांना धडा शिकवला आहे. आता विधानसभेला त्यांचा पराभव करायचा आहे. महाविकास आघाडीच्या बाजूने राज्यात वातावरण आहे. त्यामुळे तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे. आधी हे सरकार उलथवून लावू. नंतर मुख्यमंत्री कोण यावर निर्णय घेवू असे ते म्हणाले. शिवाय मुख्यमंत्रिपदाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. त्याचा निर्णय इथं बसून घेता येणार नाही. आपले उद्दीष्ठ हे महायुती सरकार उलथवून लावणे आहे.
शरद पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
राज्यातले सरकार काही कायदे आणू पाहात आहे. पण आपल्या जागृकतेमुळे तसे कायदे आणण्याचे स्वप्न सत्ताधाऱ्यांचे धुळीला मिळाले. जर कोणी आंदोलन केलं तर त्यांना पाच ते सहा वर्ष जेलमध्ये ठेवण्याचा कायदा सरकार करणार होते असे शरद पवारांनी सांगितले. तीन महिन्याने निवडणुका होतील असं सांगितलं जातंय. पण तसं होणार नाही पुढच्या दोन महिन्यातच निवडणुका होतील असे ते म्हणाले. मविआतील पक्षांनी एका विचाराने लोकांसमोर गेले पाहीजे. जनजागृती केली पाहीजे. राज्याचे चित्र बदलायचे असेल तर इथले सरकार बदलणे गरजेचे आहे असे त्यांनी स्पष्ट केले. सध्याचे सरकार चुकीच्या पद्धतीने चाललं आहे. सत्तेचा गैरवापर केला जात आहे. हे सरकार उलथवून लावायचं आहे. त्यासाठी तुमची एकजूट महत्वाची आहे. जो आघाडीचा उमदेवार असेल त्यांना निवडून आणण्यासाठी आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.