जाहिरात

Waqf Bill:'...आता असं वाटतय तुम्ही हिंदू पाकिस्तान बनवायला निघालात' संजय राऊतांनी राज्यसभा गाजवली

भाजप खासदारांकडून राऊत यांच्या भाषणा वेळी अडथळे आणले जात होते. त्यावेळी तुम्ही मला काही शिकवू नका. मी सर्व शिकून इथं आलो आहे. आता तुम्ही हिंदूत्वाचे नवे मुल्ला झाला आहात, असं ठणकावून सांगितलं.

Waqf Bill:'...आता असं वाटतय तुम्ही हिंदू पाकिस्तान बनवायला निघालात' संजय राऊतांनी राज्यसभा गाजवली
नवी दिल्ली:

वक्फ विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर ते राज्यभेत मांडले गेले. यावेळी झालेल्या चर्चे दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार फटकेबाजी करत राज्यसभा गाजवली. या विधेयकावर बोलताना राऊत म्हणाले, दोन्ही सभागृहात काही लोकांना गरीब मुस्लीमांबाबत मोठी काळजी होताना दिसत आहे. ही काळजी त्यांना अचानक वाटू लागली आहे. त्यांनी इतकी काळजी केली की मला ही भिती वाटू लागली असं म्हणत राऊत यांनी भाजपला चिमटे काढले. त्याने मीच घाबरलो नाही तर मुस्लीमांबरोबर हिंदू ही घाबरले आहेत. ऐवढी काळजी का केली जात आहे असा त्यांना पडलेला प्रश्न आहे असं म्हणत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पुढे म्हणताना राऊत म्हणेल गृह मंत्री अमित शाह, रिजिजू यांची भाषणं ऐकली. मोहम्मद अली जीना यांनी इतकी काळजी मुस्लीम समाजाची केली नाही तेवढी, काळजी तुम्ही काल पासून घेत आहात असं वाटलं. मला एक क्षण असं वाटलं की जीनाचा आत्मा कबरीतून बाहेर येवून तुमच्या शरिरात घुसला की काय? असं आम्हाला वाटवं. तसं काही असेल तर करू नका असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. आम्हाला वाटलं होतं, की तुम्ही हिंदू राष्ट्र बनवत आहात. पण आता असं वाटतय तुम्ही हिंदू पाकिस्तान बनवायला निघाले आहात. असा जोरदार प्रहार राऊत यांनी सत्ताधारी भाजपवर केला.  

ट्रेंडिंग बातमी - Pune News: पुण्यातील नामांकित रुग्णालयाला जिवापेक्षा पैसा प्यारा? शेवटी 'तिचा' जीव गेलाच

हे विधेयक आताच का आणले गेले याबाबतही राऊत यांनी सांगितले. अमेरिकेने भारतावर 26 टक्के टेरिफ लावला आहे. त्याचे परिणाम वाईट होणार आहे. रुपया डुबून मारला जाईल. हा खरा मुद्दा होता. यावर चर्चा होण्याची गरज होती. टेरिफ लावल्याने काय परिणाम होणार आहे, रुपयाचे काय होईल. याची चर्चा झाली पाहीजे होती. पण तुम्ही त्यावरचे लक्ष उडवण्यासाठी हिंदू मुस्लीम मुद्दे पुढे आणले आहेत. ज्या ज्या वेळी बेकारी, महागाई,आर्थिक मुद्दे समोर येतात, त्यावेळी भाजप असे धार्मिक मुद्दे पुढे आणून चर्चा घडवल्या जातात असा गंभीर आरोपही यावेळी राऊत यांनी केला. 

ट्रेंडिंग बातमी - Mhada News: म्हाडाचा भोंगळ कारभार! लॉटरीमध्ये फ्लॅट लागला पण बिल्डरने परस्पर विकला

गरिब मुस्लीमांच्या हिताची गोष्ट तुम्ही करत आहात. मी म्हणतो तुम्हाला मुस्लीमांची चिंता कधी पासून व्हायला लागली. तुम्हीच आहात , जे मुस्लीमांना चोर म्हणत होता, मुस्लीम तुमची जमीन हिसकावतील, तुमचं मंगळसूत्र, गाय बैल घेवून जातील. मुस्लीमांच्या दुकानातून मटण घेवू नका. बटेंगे तो कटेंगे, देशद्रोही, टेरेरिस्ट हे तुम्हीच म्हणाले होते. याची आठवण या निमित्ताने संजय राऊत यांनी भाजपला करून दिली. त्यांच्या संपत्तीची चिंती आता तुम्ही करत आहात, असा टोलाही त्यांनी याचर्चे वेळी भाजपला लगावला.  

ट्रेंडिंग बातमी - Eknath Shinde: 'मला एसंशिं म्हणतात मग मी त्यांना UT म्हणजे युज अँड थ्रो बोलू का?' शिंदे भडकले

भाजप खासदारांकडून राऊत यांच्या भाषणा वेळी अडथळे आणले जात होते. त्यावेळी तुम्ही मला काही शिकवू नका. मी सर्व शिकून इथं आलो आहे. आता तुम्ही हिंदूत्वाचे नवे मुल्ला झाला आहात, मला शिकवू नका. आमचा जन्मच हिंदत्वासाठी झाला, आहे असे राऊत यांनी ठणकावून सांगितले.पुढे राऊत म्हणाले, गृहमंत्री म्हणतात 2025 च्या आधीच्या मस्जिद, मदरसा, दर्गा यांनी आम्ही हात लावणार नाही. पण इतर जमिनींचे व्यवहार करणार. त्यातून मुस्लीम महिला मुलांचं कल्याण करणार, म्हणजे तुम्ही खरेदी विक्रीवर आलात असं ही राऊत म्हणाले. तुम्ही तुमच्या व्यापारावर आलात. तुम्हाला जमिनी विकायच्या आहेत.  13 हजार एकर जमिन घोटाळा अयोध्येत झाला आहे. केदारनाथ मधील 300 किलो सोना गायब आहे. तुम्ही हिंदूच्या जमिनीची रक्षा करू शकत नाही, तर मुस्लीमच्या जमिनीच्या संरक्षणाची गोष्टी काय करता असं ही राऊत यावेळी म्हणाले.