जाहिरात

Shivsena News: ऑपरेशन 'तुडवा' ते काँग्रेसमध्ये विलिनीकरण! उद्धव ठाकरेंनी काय आदेश दिले?

अनेक जण शिवसेनेच्या मुळावर उठले होते. पुण कुणालाही शिवसेनेला संपवता आलं नाही असं ते म्हणाले.

Shivsena News: ऑपरेशन 'तुडवा' ते काँग्रेसमध्ये विलिनीकरण! उद्धव ठाकरेंनी काय आदेश दिले?
  • शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार फुटून स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे
  • उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांवर जोरदार टिका केली आहे
  • शिवसेना कधी ही काँग्रेसमध्ये विलिन होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले. त्यांनी आता स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय ही घेतला आहे. या फुटीर खासदारांवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. उद्धव यांनी या खासदारांचा चांगलाच समाचार घेतला. शिवाय जो आरोप करून हे खासदार फुटले त्याला ही जोरदार प्रत्युत्तर दिलं. फुटीर खासदारांनी आरोप केला होता की शिवसेना काँग्रेसमध्ये विलिन केली जाणार आहे. त्याला उत्तर देताना उद्धव म्हणाले 30 वर्ष भाजप सोबत राहून भाजपमध्ये विलिन नाही झालो तर काँग्रेसमध्ये काय विलिन होणार अशा शब्दात त्यांनी बंडखोर खासदारांना फटकारले. शिवसेना विलिन होण्यासाठी झाली नाही. मराठी आणि हिंदूंच्या हक्कासाठी जन्माला आली आहे. काँग्रेसचा विषय काढला आहात तर सांगतो, काँग्रेसने आपल्या छळलं. त्यांच्या बरोबर आपलं टोकाचं वैर होतं. पण भाजपने जे आपल्यासोबत केलं ते काँग्रेसने कधीच केलं नाही. त्याला संस्कार म्हणतात असं ही उद्धव यावेळी म्हणाले. 

अनेक जण शिवसेनेच्या मुळावर उठले होते. पुण कुणालाही शिवसेनेला संपवता आलं नाही. आता काही जण म्हणत आहेत शिवसेना काँग्रेसमध्ये विलिन होणार. हे कधी ही शक्य नाही. भाजपसोबत तीस वर्षो होतो त्यावेळी भाजपमध्ये विलिन झालो नाही तर काँग्रेसमध्ये काय होणार असं ते म्हणाले. पण महाराष्ट्र भाजप आता मिंधे सेनेत विलिन होईल अशी भिती मला वाटते. उपरे आमच्या डोक्यावर बसलेत असं भाजपचेच लोक मला सांगत आहेत असं ही उद्धव ठाकरे यावेळी सांगायला विसरले नाही. त्यामुळे त्यांनी विलिनीकरणाचा मुद्दाच खोडून काढला. शिवाय या चर्चेला ही पुर्ण विराम दिला. 

नक्की वाचा - Uddhav Thackeray: शिवसेना पक्षप्रमुखपद सोडण्याची उद्धव यांची तयारी, पण ठेवली एक अट, ठाकरेंची गुगली

यावेळी बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकरांचा ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतला. उद्धव ठाकरे भेटत नाहीत. आदित्य ठाकरे राज्यात फिरत नाहीत या आरोपाला त्यांनी प्रत्युत्तर दिले. जर मी भेटत नसतो तर गधड्या तू निवडून आला असतास का? असं ठाकरे यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीत मोदींचा चेहरा न वापरता आपण नऊ खासदार निवडून आणले. कुठे होते मोदी? भाजपने आमची एक सीट चोरली. भाजपचे 20 खासदार होते. ते 9 वर आले. मग आता का खासदार फोडता? किती सत्ता पिपासू होत आहात? असा प्रश्न उद्धव यांनी यावेळी केला. अजून किती भामटेगिरी करणार आहात असं ही ते म्हणाले. काँग्रेस म्हणजे हाताचं बटण दावा. पवार साहेब म्हणतात तुतारीचं बटण दाबा. भाजप म्हणतं कोणाचं ही बटण दाबा तो आमच्याकडेच येणार आहे. असं ऑपरेश होत असेल तर आता आपल्याला आणि देशाला ऑपरेशन कमळ करावं लागेल. असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

नक्की वाचा - Eknath Shinde: तुम्ही आम्हाला काय तुडवणार? हिंमत असेल तर...'ऑपरेशन तुडवा'वर शिंदेंचे ओपन चॅलेंज

भाजप लोकशाहीला धोका आहे. देश जर असाच चालत राहीला तर तो अराजकतेकडे जाईल अशी भीती मला वाटते असं उद्धव यांनी सांगितलं. काँग्रेसने काही माणसं आपली फोडली. काही माणसं आपण काढली ती त्यांनी घेतली. पण काँग्रेसने कधी ही त्यांच्या पैकी कोणाला मुख्यमंत्री केलं नाही. मुख्यमंत्री कुणी केला असं म्हणत त्यांनी भाजपकडे रोख वळवला. काँग्रेसने आपल्याला असं छळलं नाही. काँग्रेसने मातोश्रीवर डोळे कधीच वटारले नव्हते. पण भाजप शिवसेनेला मुळासकट उखडायला निघाली आहे. मातोश्रीला बदनाम करायला निघाली आहे. हा काँग्रेस आणि भाजपमधला फरक आहे. तुमच्या हिंदूत्वा पेक्षा काँग्रेस त्यांच्या शब्दाला जागली आहे असं उद्धव म्हणाले.  

नक्की वाचा - ठाकरे गटाचा सातवा खासदारही फुटला होता, थेट मागितले होते मंत्रिपद; रामदास कदम यांचा सर्वात मोठा दावा

उद्धव ठाकरे यावेळी ऑपरेशन तुडवा बद्दल काय म्हणतात याकडे लक्ष लागले होते. यावर उद्धव यांनी शिवसैनिकांना विचारणा केली या लोकांना निवडून आणण्यासाठी  मेहनत तु्म्ही केली ना. मतं तुम्ही दिली ना. मग जाब विचारण्याचा अधिकार तुम्ही का सोडत आहात. तुम्ही का जाब विचारत नाही. त्यांची हिंमत होते कशी. मी आदेश काय देवू. आदेश दिल्यानंतर तूम्ही त्यांना निवडून दिलं. मेहनत तुम्ही घेतली. त्यामुळे तुम्ही आता जाब विचारा. तो तुमचा अधिकार आहे. तो जाब तुम्ही विचारत नाही. असं सांगत एक प्रकारे शिवसैनिकांना पुढे काय करायचे याचेच मार्गदर्शन केले. शिवाय या पुढे तुम्हाला शिवसेना हवी आहे की नाही याचा ही विचार करा असं ते म्हणाले. 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com