Amol Mitkari : 'शिंदे सरकारमधील मंत्र्यांच्या OSD नं 5 लाख मागितले', मिटकरींनी टाकला बॉम्ब

जाहिरात
Read Time: 2 mins
अकोला:

योगेश शिरसाठ, प्रतिनिधी

राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यक तसंच OSD च्या नेमणुकीवरु वरुन वाद पेटला आहे. मंत्र्यांच्या OSD तसंच स्वीय सहाय्यकाच्या नेमणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कबुली दिली होती. या नेमणुकीबाबत मुख्यमंत्री कुणाचंही चालू देत नाहीत, असं कोकाटे म्हणाले होते.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मुख्यमंत्र्यांनीही या विषयावर कोकाटे यांना खडसावले होते.  मंत्र्यांचे पीए, ओएसडी नेमण्याचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांनाच असतात. मंत्र्यांनी नावाचा प्रस्ताव पाठवायचा असतो. कुणाला राग आला तरी 'फिक्सर' लोकांच्या नावाला मान्यता देणार नाही, असं फडणवीस यांनी खडसावले होते. या सर्व प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी गौप्यस्फोट केला आहे.

एकनाथ शिंदे सरकार सत्तेत असताना एका मंत्र्यांच्या ओएसडीकडून एका कामासाठी आपल्याला 5 लाखांची मागणी करण्यात आली होती, असा गौप्यस्फोट मिटकरी यांनी केला आहे. 2 ते 3 कोटींच्या एका कामासाठी 5 लाखांची मागणी करण्यात आल्याचा दावा मिटकरी यांनी केला आहे. आधीच्या सरकारमधील रोजगार हमी विभागाच्या एका ओएसडी संदर्भात हा अनुभव आल्याचा दावा मिटकरी यांनी केलाय. 

( नक्की वाचा : Jayant Patil : जयंत पाटील भाजपात जाणार? बावनकुळेंच्या भेटीवर केला खुलासा, म्हणाले... )

ओएसडी आणि स्वीय सहाय्यकांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या रोखठोक भूमिकेचं आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून जोरदार स्वागत केलं आहे. मंत्रालयात दलालांचा सुळसुळाट झाल्यानंतर पारदर्शक सरकारसाठी मुख्यमंत्र्यांनी उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे, असं मिटकरी म्हणाले. 

Advertisement
Topics mentioned in this article