लोकसभा निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीला चांगली साथ दिली. पण विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागला. या निकालाने सर्वच जण हबकले आहेत. पण त्या निवडणुकीत आपल्या सरकारने केलेली कामं आपण जनतेपर्यंत पोहचवू शकलो नाही. जो काही संभ्रम निर्माण झाला होता तो दुर करण्यात आपण अपयशी ठरलो. शिवाय तुम्ही किती देता 2100 मग आम्ही 3000 देतो यात आपण अडकलो. त्यामुळे पराभवाला सामोरे जावं लागलं अशी कबुलीच उद्धव ठाकरे यांनी दिली. शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा नाशिक येथे पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हिंदुत्वा पासून ते विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवापर्यंत अनेक मुद्द्यांना या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी हात घातला. वक्फ विधेयकाला का पाठिंबा दिला नाही याबाबतही स्पष्टीकरण देताना सौगात ए मोदी काय होतं असा प्रश्नही त्यांनी या निमित्ताने केला. विधानसभा निवडणुकीत आपल्या सरकारने केलेलं काम आपण जनतेपर्यंत पोहचवू शकलो नाही. आपण मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांची कर्ज माफी केली. 10 रुपयांत शिवभोजन दिलं. मुंबईत मालमत्ता कर माफ केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंटेवारी बंद केली या सारखी अनेक कामं कोरोना असतानाही केली. कोरोना काळात केलेल्या कामाची दखल तर सगळ्यांनी घेतली होती असं ठाकरे यावेळी आवर्जून म्हणाले.
पण हे काम आपण जनतेपर्यंत निवडणुकीत पोहोचवू शकलो नाही. आपण भ्रमात अडकलो. त्यांनी 2100 रुपये देणार असं म्हटल्यावर आपण 3000 देणार असं म्हटत होतो. या चढाओढीत आपण अडकून राहीलो. त्यात केलेली चांगली कामे सांगताच आली नाहीत अशी कबुलीच ठाकरे यांनी यावेळी दिला. यावेळी त्यांनी भाजपव जोरदार टिका केली. मी भाजपला सोडलं. हिंदुत्व सोडलं नाही. हिंदुत्व कधी ही सोडणार नाही. भाजपचं हिंदुत्व बुरसटलेलं. मेलो तरी हिंदुत्व सोडणार नाही. असं ठणकावून ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. ज्यांनी हिंदुत्वाचा भगव्याचा अपमान केला त्यांच्या बरोबर भाजर आज आहे. असं सांगत भाजपने सत्ता जिहाद केल्याचा हल्लाबोल ठाकरे यांनी केला. चंद्राबाबु नायडू, नितिश कुमार भाजपला कसे चालात. एआयडीएमके बरोबर युती कशी होते असे प्रश्नही त्यांनी यावेळी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपुजन पंतप्रधान मोदींनी केले. त्यावेळी आम्हीही त्यांच्या बरोबर होतो. राज्यात फडणवीस होते. पण स्मारक काही झालं नाही. हे स्मारक राजभवनात व्हावं अशी मागणीही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा राज्यपाल मोठे असूच शकत नाही. राजभवनच्या जागी छत्रपती शिवाजी महाराजाचं मोठ स्मारक उभं करा, ही शिवसेनेची मागणी आहे. राज्यापालांना एखाद्या मंत्र्याचा बंगला द्या, असं ही ते यावेळी म्हणाले. सरकार तसा निर्णय घेणार असेल तर त्याला शिवसेनेचा पाठिंबा राहीले असंही त्यांनी सांगितलं. तसाही राज्यपालांचा जनतेशी किती संबंध असतो असा प्रश्नही ते करायला विसरले नाहीत.
मुस्लीमांसाठी दिलेल्या सौगात ए मोदी वरूनही ठाकरे यांनी भाजपवर टिकेची झोड उठवली. त्यांना सौगात ए मोदी आणि हिंदुना दिली घंटा, त्यांना देताय सौगात. चांगलं आहे. पण त्या आधी काय करत होते, तर बटेंगे तो कटेंगे. आता बिहारमध्ये बाटेंगे तो जितेंगे करत आहेत. पण 32 लाख मुस्लीम कुटुंबांना सौगात-ए- मोदी वाटली. त्यातले कोण देशप्रेमी मुस्लमी आहेत, हे कसे ओळखलं. त्यासाठी काय परिमाण वापरलं ते सांगणार आहात का? असा खडा सवाल ही ठाकरे यांनी या निमित्ताने उपस्थित केला. वक्फ सुधारणा विधेयकाला शिवसेनेनं विरोध केला. त्यावेळी भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांची भाषण कशी होती हे काढून पाहावे मग कुणी हिंदुत्व सोडलं आहे हे समजले असं ही ठाकरे यावेळी म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना महाराष्ट्रा पुरता मर्यादीत करु नका असे अमित शाह म्हणाले. त्यांच्या यावक्तव्याचा ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. महाजारांची किर्ती कित्येक शतकापासून जगात होती. सुरतेची लुट झाली त्याची बातमी इंग्लंडमध्ये छापून आली होती, याची आठवण ठाकरे यांनी करून दिली. शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुम्हाला आदर असेल तर शीव जयंतीला देशभर सुट्टी जाहीर करा. मता पुरता जय शिवाजी म्हणू नका. असं ही ठाकरे यावेळी म्हणाले.