KDMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 'हा बडा नेता भाजपच्या गळाला? राजीनाम्याचं धक्कादायक कारण समोर

जाहिरात
Read Time: 2 mins
Shivsena UBT leader Sainath Tare Resignation
मुंबई:

KDMC Election 2025 Latest News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम येत्या काही दिवसांतच वाजणार आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. अशातच कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे ठाणे ग्रामीण संपर्क प्रमुख साईनाथ तारे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. तारे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी कल्याण पश्चिम मतदारसंघात तारे इच्छूक होते.परंतु, ऐनवेळी सचिन बासरे यांना उमेवदारी देण्यात आली होती. तारे हे शिवसेना उपनेते विजय साळवी यांचे निकटवर्तीय मानले जातात.

साईनाथ तारे यांनी का दिला संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा?

केडीएमसी निवडणुकीपूर्वीच ठाकरे शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता.त्यानंतर आता ठाकरे गटाचे ठाणे ग्रामीण संपर्क प्रमुख तारे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.तारे यांनी या संदर्भातील पत्र व्यवहार पक्षाच्या वरिष्ठांकडे केला आहे. प्रकृती ठिक नसल्याचं कारण तारे यांनी राजीनामापत्रात दिले आहे.

नक्की वाचा >> चावी हरवली..नो टेन्शन! तरुणाने फटाक्याचा भन्नाट जुगाड करून घराचं कुलूप तोडलं, व्हिडीओनं इंटरनेटवर केला धमाका

पक्षातील काही लोक त्यांच्या कामकाजात अडथळा निर्माण करायचे, असंही तारे यांनी म्हटलं आहे.साईनाथ तारे हे 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक होते.त्यांनी उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र ऐनवेळी तत्कालीन शिवसेना शहर प्रमुख सचिन बासरे यांना उमेदवारी दिली गेली.त्यामुळे तारे यांचा हिरमोड झाला.सध्या तारे हे भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. या संदर्भात तारे यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाहीय. 

साईनाथ तारे ठाकरे गटातील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक मानले जाता. ठाणे जिल्ह्यात ते राजकीयदृष्ट्या प्रचंड सक्रीय असून त्यांना शेकडो शिवसैनिकांचा पाठिंबा आहे, असं म्हटलं जातंय. परंतु, साईनाथ तारे यांनी शिवसेना ठाकरे गटाला रामराम ठोकल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीच तारे यांनी उद्धव ठाकरेंना धक्का दिला आहे. तारे शिवसेना ठाकरे गट सोडून भाजपचं कमळ हाती घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. तारे यांच्या राजीनाम्यामुळे ठाणे ग्रामीणमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. 

Advertisement

नक्की वाचा >> शेतकऱ्यांमध्ये संताप! बैलाची कत्तल करणाऱ्या मांस तस्करांचा सुळसुळाट..'या' गावात घडली सर्वात भयंकर घटना!

Topics mentioned in this article