![Uddhav Thackeray:'फोडाफोडी कराल तर तुमची डोकी फोडू' उद्धव ठाकरेंचा इशारा कुणाला? Uddhav Thackeray:'फोडाफोडी कराल तर तुमची डोकी फोडू' उद्धव ठाकरेंचा इशारा कुणाला?](https://c.ndtvimg.com/2024-11/pe8c2g9_uddhav-thackeray_625x300_17_November_24.jpg?im=FitAndFill,algorithm=dnn,width=773,height=435)
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार फुटणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या चर्चेला शिंदे गटाकडूनही हवा दिली जात आहेत. सहा ते सात खासदार फुटणार असं म्हटलं जात आहे. त्यावर एकनाथ शिंदे यांनी तर सर्वच जण माझ्या संपर्कात आहेत असं वक्तव्य करत ठाकरे गटावर मोठा बॉम्बच टाकला. त्यानंतर शिंदे सेनेचा समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यअहवाल प्रकाशन सोहळ्या वेळी ते बोलत होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
डोकं नाही म्हणून काही जण दाढी खाजवतात. असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. सकाळी एक बातमी सोडण्यात आली. शिवसेनेचे सहा सात खासदार फुटणार. हिंम्मत असेल तर माझा खासदार फोडून दाखवा. आता शिवसैनिकांचा अंत पाहू नका. फोडाफोडी कराल तर तुमची डोकी कधी फुटतील तुम्हाला समजणार नाही. तुम्हाला फोडाफोडी करायची असेल तर इडी, सीबीआयला बाजूला ठेवा. हे नामर्द आहेत. त्यांच्यात हिंमत नाही. असंही उद्धव यावेळी म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून कुणाला वगळले? यादी आली समोर
जसा माझा पक्ष फोडत आहात. तशी माझ्या देशाची वाट लावत आहात, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला. मी भाजपला सोडलं, पण हिंदुत्वव नाही सोडलं. पण माझ्या नरडीचा घोट कोणी घेत असेल तर मी त्याला सोडणार नाही असा इशाराही उद्धल ठाकरे यांनी यावेळी दिला. ज्यांनी गद्दारी केली त्यांची मनं मेली आहेत. दिल्लीत मोदींच सरकार असलं तरी ते महाराष्ट्राला दुखवू शकत नाहीत. सगळे तुमचे गुलाम होणार नाहीत. आम्ही लढत राहाणार असंही त्यांनी सांगितलं.
विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबतही ते बोलले. जे काही बहुमताच ढोंग आहे ते पूर्ण पणे फाटलं आहे. बहुमत येऊनही मुख्यमंत्री कोण हे ठरवण्यात एक महिना गेला. आता पालकमंत्री कोण ठरत नाही. त्यामुळे महायुतीत कशी स्थिती आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मुंबईत कोस्टल रोड जो केला त्यात ना मोदींनी...ना फडणवीस यांनी... ना गद्दारांनी पैसा दिला. त्याला मुंबई महापालिकेने पैसे दिला. पण आज महाराष्ट्र मारला जातोय. मुंबई मारली जात आहे. जी मुंबई आर्थिक राजधानी आहे. तिला आता भिकेला लावायला चाले आहेत असा आरोपही त्यांनी केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world