
आंदोलन म्हटलं की गर्दी ही आलीच. गर्दी ही जास्त दिसली की समजायचं ते आंदोलन यशस्वी झालं. त्यामुळे आंदोलना वेळी गर्दी जमवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. अनेक प्रलोभनं ही दाखवली जातात. लोक ही मग अशा आंदोलनात सहभागी होती असतात. आता एका आंदोलनासाठी चक्क मटण पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यातू मोठ्या प्रमाणात गर्दीही जमवण्यात आली होती. या मटण पार्टीचा व्हिडीओ ही सध्या सोशल मीडियावर व्हायलर होत आहे. ही घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. शिवाय या पार्टीची चर्चाही चांगलीच रंगली आहे.
माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी कारण थोडं वेगळं आहे. जानकर यांनी रास्ता रोको आंदोलन आयोजित केलं होतं. या आंदोलनासाठी गर्दी जमवायची होती. त्यामुळे त्यांनी चक्क आंदोलकांना मटन पार्टी दिली असा आरोप ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे. या मटण पार्टीचे व्हिडीओ ही आता समोर आले आहेत. ही धक्कादायक बाब समोर आल्यानंतर जानकर यांच्यावर टीका होत आहे. आमदारांच्या या मटन पार्टीवर टिका होत असतानाच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही आमदार जानकर यांच्यावर जोरदार शाब्दीक हल्ला चढवला आहे.
आमदार जानकर यांनी मटन पार्टीमध्ये जाता जाता केलेले हे आंदोलन आहे. पाणी आणि आंदोलना बद्दल प्रेम नाही हे यातून दिसून येते असा आरोप गोरे यांनी केला आहे. रास्ता रोको आंदोलन म्हणजे आमदार जानकर यांची ही स्टंटबाजी असल्याची टिका पालकमंत्री गोरे यांनी केली. माळशिरस तालुक्यातील 22 गावांना नीरा देवघर धरणातून शेतीसाठी पाणी मिळावे या मागणीसाठी आमदार उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली माळशिरस म्हसवड महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
नक्की वाचा - Mamata banerjee: ठाकरेंच्या पावलावर ममता बॅनर्जींचे पाऊल! बंगालमध्ये घेतला मोठा निर्णय
या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या आंदोलनाचा रोख थेट पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या दिशेने होता. सोलापूर जिल्ह्यात अनेक गावात अजूनही पाण्याची समस्या आहे. त्यात गोरे ग्राम विकास मंत्री आहेत. त्यांनी या प्रकरणाला थेट वेगळेच वेळण देत ते मटण पार्टीच्या दिशेने नेले आहे. त्यामुळे गोरे यांच्या या टीकेला आता आमदार उत्तमराव जानकर काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world