अजित पवार निवडणूक लढणार की नाही? तटकरेंनी आतली बातमी दिली

अजित पवार निवडणूक लढणार की नाही याबाबत आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आतली बातमी सांगितली आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

विधानसभा निवडणुकीची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जोरदार चालवली आहे. त्यासाठी त्यांनी जन सन्मान यात्राही काढली आहे. ही यात्रा संपुर्ण राज्यात जाणार आहे. अजित पवार त्याचे नेतृत्व करत आहेत. कार्यकर्त्यांना बळ देणं आणि सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणं हा त्या मागचा उद्देश आहे. अशातच अजित पवारांच्या एका वक्तव्याने पक्षातच नाही तर राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे. बारामतीतून निवडणूक लढण्यास आपण इच्छुक नाही असे वक्तव्य त्यांनी केले. त्याच्या प्रतिक्रियाही लगेच उमटल्या. चर्चंना उधाण आले. त्यात आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आतली बातमी सांगितली आहे. त्यामुळे या चर्चांना पुर्ण विराम मिळेल. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

सुनिल तटकरे काय म्हणाले? 

निवडणूक लढणारचं नाही असे वक्तव्य अजित पवारांनी केलेले नाही असे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. विनाकारण त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. विधानसभेच्या निवडणुका महायुतीत राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांच्या नेतृत्वात लढणार आहे. पक्षाला मोठं यश कसे मिळवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असे तटकरे म्हणाले. शिवाय बारामतीतून लढण्यास इच्छुक नाही हे अजित पवार नक्की कोणत्या उद्देशाने म्हणाले हे माहित नाही. त्याबाबत त्यांच्या बरोबर चर्च करू असेही त्यांनी सांगितले. काही झाले तरी अजित पवारांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढली जाईल. शिवाय पक्षाला घवघवीत यश मिळेल असेही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - मविआचं ठरलं, विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार!

'ते प्रश्नाला दिलेलं उत्तर'  

बारामती बाबत अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला दिलेल ते उत्तर होतं. जय पवारहे बारामतीतून निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. असा प्रश्न विचारला गेला. त्याला उत्तर देताना दादांनी बारामतीतून लढण्यास इच्छुक नाही असे म्हटले होते. शिवाय तिथली जनता कार्यकर्ते ठरवतील. शिवाल पक्षाचे संसदीय मंडळही त्याबाबत निर्णय घेईल असे तटकरे म्हणाले. अजित पवारांनी बारामतीतून निवडणूक लढावी यासाठी आग्रह करण्याची गरज नाही. बारामतीकरांचे त्यांच्यावर प्रेम आणि विश्वास दोन्ही आहे. त्यामुळे ते निवडणूक लढतील हे सांगण्याची गरज नाही. शिवाय बारामतीचा चेहरा मोहरा कोणी बदलला असेल तर तो अजित पवारांनीच बदलला आहे असेही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - बारामतीतून अजित पवारांची माघार? निवडणूक न लढण्याचे कारण काय?

'विरोधकांकडे लक्ष्य देण्याची गरज नाही' 

अजित पवार हे निवडणुकीला नक्कीच सामोरे जातील.शिवाय त्यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व यश मिळेल असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला आहे. सध्या विरोधकांकडे लक्ष देण्याची आवश्यकता शिल्लक राहिली नाही. विरोधीपक्ष म्हणजे अवसान गळालेला आहे. ते केवळ टिका करत आहेत. रोहित पवारांवरही यावेळी तटकरे यांनी टिका केली. अकाली आलेल्या प्रॉडक्ट बदल काही बोलावं असं मला वाटत नाही, असे तटकरे रोहित पवारांबाबत बोलले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  पंतप्रधान मोदींनी स्वत:चाच रेकॉर्ड मोडला; लाल किल्ल्यावर पुन्हा रचला इतिहास!

काय म्हणाले होते अजित पवार? 

बारामतीतून आपण सात ते आठ वेळा निवडणूक लढली आहे आणि जिंकलीही आहे. त्यामुळे यावेळी निडणूक लढण्यास आपण इंटरेस्टेट नाही, असं असलं तरी याबाबतचा निर्णय पक्षाचे संसदीय मंडळ घेईल. कोणाला उमेदवारी द्यायचे तेही तेच ठरवतील असे वक्तव्य अजित पवारांनी केले आहे. त्यामुळे अजित पवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 


 

Advertisement