विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वत्तव्याने सर्वच जण आवाक झाले आहे. बारामती विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास आपण इच्छुक नाही. आतापर्यंत सात ते आठ वेळा या मतदार संघातून निवडणूक लढलो आहे. त्यामुळे आता त्यात इंटरेस्ट नाही. मात्र शेवटी संसदीय मंडळ बारामतीतून कोणाला उमेदवारी द्यायची हे ठरवेल असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यामुळे या वेळी अजित पवार बारामतीतून लढणार नाही याचेच संकेत त्यांनी दिले आहेत. शिवाय हा निर्णय अजित पवारांनी का घेतला याचीचही जोरदार चर्चा आता बारामती बरोबर राज्याच्या राजकारणात रंगली आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बारामती विधानसभा मतदार संघ अजित पवारांचा गड मानला जातो. 1991 पासून अजित पवार सतत या मतदार संघातून निवडून आले आहेत. यावेळची विधानसभा निवडणुकही ते बारामतीतून लढतील हे मानले जात होते. पण त्यांच्या एका वक्तव्याने आता ट्वीस्ट निर्माण झाला आहे. बारामतीतून आपण सात ते आठ वेळा निवडणूक लढली आहे आणि जिंकलीही आहे. त्यामुळे यावेळी निडणूक लढण्यास आपण इंटरेस्टेट नाही. असं असलं तरी याबाबतचा निर्णय पक्षाचे संसदीय मंडळ घेईल. कोणाला उमेदवारी द्यायचे तेही तेच ठरवतील असे वक्तव्य अजित पवारांनी केले आहे. त्यामुळे अजित पवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नक्की वाचा - 78th Independence Day LIVE : 'आपला देश बुद्धांचा, युद्ध आपला मार्ग नाही'; लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचा संदेश
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतून बारामती विधानसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे यांना जवळपास 47 हजार मतांचे मताधिक्य होते. अजित पवारांच्यात मतदार संघातून त्यांच्या पत्नी या पिछाडीवर होत्या. त्यामुळे सुरक्षित मतदार संघातून निवडणूक लढण्यावर अजित पवारांचा भर आहे का? असा प्रश्नही या निमित्ताने होत आहे. अजित पवार कोणतीही रिस्क घेण्याच्या तयारीत नाहीत का? असंही बोललं जात आहेत. त्यामुळेच बारामती नाही तर अन्य मतदार संघाची चाचपणी अजित पवार करतायत का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
ट्रेंडिंग बातमी - मविआचं ठरलं, विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार!
बारामती विधानसभा मतदार संघातून अजित पवारांचे पुत्र जय पवार हे निवडणूक लढतील अशी ही चर्चा सुरू झाली आहे. अजित पवारांनीही त्याबाबत नकार दिलेला नाही. जय यांना उमेदवारी द्यायची की नाही याचा निर्णय पक्ष घेईल. तिथल्या जनतेची तशी मागणी आहे का? याचाही विचार केला जाईल असे ते म्हणाले. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून युगेंद्र पवार हे मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत. त्यामुळेच जय पवार हे तिथून लढतील अशी चर्चा सुरू झाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world