विधानसभा निडणुकीच्या तोंडावर सुनिल तटकरे यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यामुळे महायुतीचं टेन्शन वाढण्याची दाट शक्यता आहे. महायुतीत शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे. या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चांगले सुसंवाद आहे. समन्वय ही आहे असे सुनिल तटकरे म्हणाले आहे. पण जिल्हा आणि तालुका पातळीवर सुसंवाद नाही याची स्पष्ट कबुली राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिली आहे. शिवसेना आणि भाजप बरोबर पहिल्यांदाच युती केली आहेत. पण कार्यकर्त्यांची मने काही जुळलेली नाहीत. त्यामुळे स्थानिक पातळीवर वाद होताना दिसत असल्याचे ते म्हणाले. एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राष्ट्रवादी काँग्रेसने सतत शिवसेना आणि भाजप बरोबर संघर्ष केला आहे. त्यात स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते आघाडीवर होते. यावेळी आम्ही युतीत आहोत. असं असलं तरी तालुका आणि जिल्हा पातळीवर कार्यकर्त्यांची मनं काही जुळलेली नाहीत हे सत्य आहे. ज्यांच्या बरोबर संघर्ष केला त्यांच्या बरोबर जुळवून घेण्यात अडचणी येत आहेत. त्यातूनच काही जण काही वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. पण आपण त्याकडे लक्ष देत नाही असे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र नेत्यांच्या आणि पक्षाच्या पातळीवर महायुतीत चांगला समन्वय असल्याचेही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - NDTV मराठीचा दणका! अखेर त्या सातबाऱ्यावरचे 'पाकिस्तान' हे नाव हटवले
लोकसभा निवडणुकीत आम्हाला अपयश आले. त्याला महत्वाचं कारण होतं ते म्हणजे समन्वयाचा आभाव. समन्वय नसल्यामुळे आम्हाला पराभव स्विकाराला लागला असेही तटकरे यावेळी म्हणाले. पण लोकसभे प्रमाणे आता स्थिती नाही. विधानसभेला महायुतीला आणि घड्याळा शिवाय पर्याय नाही असेही त्यांनी सांगितले. सहानुभूती एकदाच मिळते. ती वारंवार मिळत नाही. महायुती म्हणून ताकदीने आम्ही निवडणूक लढू आणि जिंकू असेही त्यांनी स्पष्ट केले.
ट्रेंडिंग बातमी - दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मिळावे! अर्ज कोणी केला? ठाकरे की शिंदे गटाने?
अजित पवार बारामती सोडून कुठलाही मतदार संघ शोधत नाहीत असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. ते बारामतीतूनच निवडणूक लढतील. त्यांची बारामतीकरांबरोबर संवाद साधण्याची एक पद्धत आहे. त्यानुसार ते बोलत असतात. बारामतीच्या विकासासाठी त्यांनी मोठं काम केलं आहे. असं असतानाही तिथे अपेक्षित यश त्यांना मिळालं नाही. त्यामुळे तुम्हाला दुसरा आमदार चालेल का? असा सवाल त्यांनी केला असेल असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
नक्की वाचा - 10 वर्षांनी पाळणा हलला, बारसं करून पुण्याला जाताना कुटुंब संपलं; ड्रिंक अँड ड्राइव्हमुळे 4 हकनाक बळी!
जागा वाटपाबाबत महायुतीत चर्चा सुरू आहे. लवकरच जागा वाटप जाहीर करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. शिवाय जयंत पाटील यांच्या वक्तव्याचा ही त्यांनी समाचार घेतला. राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्यासाठी रागं लागली आहे असे वक्तव्य पाटील यांनी केले होते. रांग लागली आहे तर घ्या असे प्रत्युत्तर तटकरे यांनी दिले आहे. जयंत पाटील यांना असे बोलल्या शिवाय पर्याय नाही. त्यामुळे ते बोलत आहेत. त्यानाही माहित आहे की आता सहानुभूती मिळणार नाही. लोकसभेला जे झाले ते विधानसभेला होणार नाही असेही तटकरेंनी स्पष्ट केले.
केंद्रातलं सरकार विधानसभेनंतर कोसळणार असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हण यांनी केले होते. त्याचाही समाचार तटकरे यांनी घेतला. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुळे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार गेलं असा हल्लाबोल त्यांनी केला. शिवाय चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी चव्हाणांच्या कानात सांगितलं का की ते पाठिंबा काढणार आहेत असा सवालही त्यांनी केला. चव्हाण यांनी एनडीएवर बोलण्या पेक्षा स्वत:च्या मतदार संघात पक्षात काय चाललं आहे त्याकडे लक्ष द्यावे असे ते म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world