विधान परिषदेत अनिल परब आणि चित्रा वाघ यांच्यात झालेला वाद ताजा असताना, त्या वादात आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतली आहे. त्यांनी चित्रा वाघ यांना डिवचत, त्यांनाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रा वाघ यांचा स्वभाव कसा आहे? त्या कशा बोलतात? यावर अंधारे यांनी टीका केलीच, पण संजय राठोड प्रकरणात त्यांच्या वर्मावरच बोट ठेवले. शिवाय मेमबूब शेख यांना कशा पद्धतीने याच वाघ यांनी अडकवण्याचा प्रयत्न केला हे ही त्यांनी कोर्ट ऑर्डर दाखवत एकच हल्लाबोल केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चित्रा वाघ यांनी विधानपरिषदेच विचित्र बडबड केली. त्यानंतर झोपडपट्टीची भाषा वापरली गेली अशी त्यांच्यावर सोशल मीडियावर टीका झाली असं अंधारे म्हणाले. पण झोपडपट्टीला ही एक क्लास असतो, असं म्हणत त्यांनी चित्रा वाघ यांना डिवचलं. झोपडपट्टीतील लोक हे प्रामाणिक असतात. ते गरीब असले तरी आपलं इमान विकणारी नसतात. त्यामुळे वाघ बाईं बद्दल बोलताना झोपडपट्टीचा उल्लेख करु नका असं म्हणत अंधारे यांनी जोरदार टोलेबाजी केली.
चित्रा वाघ ज्या काही बोलल्या,'बाईंचा तो नाद, त्यांच्या स्वभावाला औषध नाही' असं ही अंधारे म्हणाल्या. भाजपवरही त्यांनी यावेळी निशाणा साधला. बायकांच्या आडून नथीतून तिर मारण्याचा प्रयत्न भाजप करतं. त्यातून व्हिक्टीम कार्ड खेळलं जातं. त्यातूनच विचित्र बाईने किंचाळत विधानसभेत काय काय सांगितलं. त्याच बाई एक वेळ उद्धव ठाकरेंकडे पक्ष प्रवेशासाठी लोळत आल्या होत्या, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
यावेळी संजय राठोड यांच्याबाबत ही अनेक प्रश्न अंधारे यांनी उपस्थित केले. वाघ म्हणतात राठोड यांना उद्धव ठाकरेंनी क्लिनचिट दिली होती. जर ती क्लिनचिट प्रमाण मानून तुमच्या नेत्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी संजय राठोड यांना मंत्री केलं का? असा कचाट्यात पकडणार प्रश्नही वाघ यांना केला. बरं तसं असेल तर वाघ बाईंनी एका भटत्या विमुक्त नेत्याचे आयुष्य उद्धवस्त करत होत्या, असा आरोप ही अंधारे यांनी केला. शिवाय वाघ यांची पुरती कोंडीही या निमित्ताने केली.
स्वताच्या राजकीय करिअरसाठी पूजा चव्हाणचं आयुष्य चित्रा वाघ यांनी सार्वजनिक पणे उधळलं. वाघ बाई कशासाठी लढत होत्या? असा प्रश्नही त्यांनी केला. संजय राठोडची केस परत का ओपन करत नाही? असं ही त्या म्हणाल्या. शिवाय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनाही अडकवण्या मागे चित्रा वाघ यांचाच हात होता असा आरोपही त्यांनी यावेळी केला. त्यामुळे त्यांचा इतिहास पाहाता अनेक गोष्टी स्पष्ट होतात असं ही त्यांनी सांगितलं.