लाडक्या बहिणीवरून अंधारेंनी भाजपला डिवचले, केले दोन कडक सवाल

आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपला दोन सवाल केले आहेत. त्यासाठी त्यांनी लाडकी बहिणीचा संदर्भ दिला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

महायुतीला बहुमत मिळाले आहे. पण अजूनही सरकार स्थापन झाले नाही. शिवाय मुख्यमंत्री कोण हे अधिकृत पणे जाहीर झालेले नाही. यावरून विरोधकांनी आता महायुतीवर टीकेची झोड उठवली आहे. येवढं बंपर बहुमत मिळूनही सरकार स्थापन का करता येत नाही असा प्रश्न केला जात आहेत. त्यात आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपला दोन सवाल केले आहेत. त्यासाठी त्यांनी लाडकी बहिणीचा संदर्भ दिला आहे. हे प्रश्न विचारत त्यांनी भाजपला डिवचले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लाडकी बहिण योजनेचा भाजपने गवगवा केला. पण या लाडक्या बहिणींना सत्तेतला वाटा मिळणार का? असा प्रश्न अंधारे यांनी भाजपला केला आहे. शिवाय लाडक्या बहिणीला 1500 रूपये आणि सत्तेच्या तिजोरीच्या चाव्या भावाच्या हातात. हे किती दिवस चालणार असा प्रश्नही त्यांनी केला आहे. यापेक्षा महत्वाच्या मुद्द्याल त्यांनी हात घातला आहे. मुख्यमंत्री कोण होणार हे भाजपला अजूनही ठरवता आले नाही. त्यांच्याकडे एकही महिला मुख्यमंत्रिपदासाठी योग्य नाही का असा थेट प्रश्नही त्यांनी भाजप नेत्यांना केला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - कोणाच्या वाट्याला कोणती खाती? शिंदे- पवारांच्या पदरात काय? संभाव्य मंत्रिमंडळाची यादी आली

दरम्यान यावेळी त्यांनी शिवसेना शिंदे गटावरही टीका केली. शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्यांना विजयाची खात्री नव्हती. त्यामुळेच ते बोलत होते 26 नोव्हेंबरला मविआने सरकार स्थापन केले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल. आता शिंदे गटाचा सत्तेतला दावा संपला आहे. नवे सरकार 5 डिसेंबरला येईल असं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्र्यांनीही राजिनामा दिला आहे. ते सध्या काळजीवाहू आहेत. त्यामुळे पाच तारखेपर्यंत राज्य कोणाच्या भरवश्यावर आहे असा प्रश्नही अंधारे यांनी केला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Big News : एकनाथ शिंदे यांचा उपमुख्यमंत्रिपद घेण्यास नकार, खात्रीलायक सूत्रांची माहिती

सुषमा अंधारे या नेहमीच शिवसेना शिंदे गट असो अथवा भाजप असो त्यांना नेहमीच टीकेचे लक्ष करत असतात. यावेळीही त्यांनी महायुतीला लक्ष्य केलं आहे. महायुतीला बहुमत मिळूनही त्यांनी अजूनही सत्ता स्थापन केली नाही. त्यामुळे सुषमा अंधारे या आक्रमक झाल्या आहेत. त्या एकही संधी टीका करण्याची सोडत नाहीत. आता त्यांनी लडक्या बहिणीचा संदर्भ देत भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय भाजपकडून महिला मुख्यमंत्री होवू शकत नाही का असा प्रश्नही केला आहे. 

Advertisement