एमआयएमचा मोठा डाव? थेट ऑफर, महाविकास आघाडीचं टेन्शन वाढणार?

माजी खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मविआला खुली ऑफर दिली आहे. त्यांच्या या खुल्या ऑफरने महाविकास आघाडीची मात्र कोंडी झाली आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
छत्रपती संभाजीनगर:

विधानसभा निवडणुकीची तयारी सध्या जोरदार सुरू आहे. आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत राज्यात होणार आहे. तिसऱ्या आघाडीचेही प्रयत्न सध्या सुरू आहेत. अशा एमआयएमने नवा डाव टाकला आहे.त्याचे पडसाद आता राज्याच्या राजकारणात नक्कीच उमटतील. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एमआयएमला सोबत घ्यावे. इंडिया आघाडीत आम्ही येण्यास तयार आहोत. याबाबत शरद पवारांनी निर्णय घ्यावा. ज्या जागा तुम्ही द्याल त्या आम्ही लढायला तयार आहोत अशी थेट ऑफरच माजी खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी दिली आहे. त्यांच्या या खुल्या ऑफरने महाविकास आघाडीची मात्र कोंडी झाली आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने एकगठ्ठा मतदार महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकलं. एमआयएमलाही त्याचा फटका बसला. छत्रपती संभाजीनगरचे एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील हेही पराभूत झाले. आता विधानसभा निवडणुकीच्या तयाराली एमआयएम लागला आहे. मात्र त्यांनी आता नवा डाव खेळला आहे. यात महाविकास आघाडीच चांगलीच कोंडीत सापडली आहे. एमआयएमने थेट इंडिया आघाडीत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीत आम्हाला घ्यावे अशी मागणी पक्षाचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - मनसेचा बडा नेता अजित पवारांच्या भेटीला, तर्क वितर्कांना उधाण

काँग्रेस, शरद पवार आणि नवीन सेक्युलर झालेली शिवसेना यांनी आम्हाला सोबत घ्यावं, असं आवाहन इम्तियाज जलील यांनी केली आहे. आम्ही तुम्हाला ऑफर देतो. त्याचा विचार मविआने करावा. शिवाय तुम्ही ठरवाल  त्या जागा आम्ही लढू असेही जलील म्हणाले. एमआयएमला आघाडीत घेतल्यास त्याचा फायदा आम्हालाही होईल आणि आघाडीलाही होईल असे ते म्हणाले. आमची इंडिया आघाडी बरोबर येण्याची इच्छा आहे. तसा आम्ही निर्णय घेतला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीच्या नेत्यांनी याबाबत विचार करावा असेही ते म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - काँग्रेसचे दोन आमदार 'हाता' ची साथ सोडणार? मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा अर्थ काय?

इम्तियाज जलील एमआयएम सोडणार अशा बातम्या समोर येत होत्या. याबाबतम्या जलील यांनी फेटाळून लागवल्या आहेत.  
मी 200 टक्के एमआयएम पक्ष सोडणार नाही, असे त्यांनी सांगितले आहे. ओवैसी यांनी मला संधी दिली. त्याच्याकडून प्रेरणा मिळाली. इकडे जाणार तिकडे चर्चा होते, पण जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. शरद पवारांना भेटल्याची ही चर्चा आहे. पण शरद पवारांना भेटलो नाही असेही ते म्हणाले. आगामी निवडणुकीत इंडिया आघाडीने आम्हला त्यांच्या बरोबर घ्यावे असे ते म्हणाले. 30 जागांवर आम्ही सर्वे केला आहे. त्या लढण्याच पक्षाचा प्रयत्न असेल असे ते म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  'लाडक्या बहिणी'साठी वर्षा गायकवाडांनी पदर खोचला, निवडणुकीच्या रिंगणात दिसणार नवा चेहरा

लोकसभा निवडणुकीत मुस्लिम आणि दलित समाजाने महाविकास आघाडीला भरभरून मतदान केले. त्यानंतर आता एमआयएमने आपल्यालाही आघाडीने बरोबर घ्यावे. त्याचा फायदा आघाडीला होईल असा डाव टाकला आहे. त्यामुळे आघाडीची कोंडी झाली आहे. एमआयएम म्हणजे बीजेपीची बी टीम असा नेहमीच आरोप झाला आहे. त्यात आता एमआयएमनेच आघाडी घेण्यासाठी प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे आघाडीचे नेते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.