
राज्याचा अर्थसंकल्प नुकताच अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला. त्यात त्यांनी काही स्मारकांसाठी निधीची ही घोषणा केली. त्यात आता शेजारच्या तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी महाराष्ट्रातल्या एका स्मारकासाठी 1 कोटीच्या निधीची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. शिवाय हे स्मारक कोणते आणि कुठे होत आहे याची ही चर्चा लागलीच सुरू झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रेवंत रेड्डी हे काँग्रेसचे तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी मार्कंडे महाराजांच्या स्मारकासाठी 1 कोटीच्या निधीची घोषणा केली आहे. हे स्मारक सोलापूरमध्ये होणार आहे. सोलापूरची सीमा तेलंगणाला लागून आहे. त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात तेलगू भाषीक आहेत. शिवाय पद्मशाली समाजाची ही मोठी संख्या आहे. हा समाज मार्कंडे महाराजांचा भक्त आहे. विधानसभा निवडणुकी वेळी रेड्डी हे सोलापूरमध्ये आले होते.
त्यावेळी सोलापुरातील नागरिकांनी मार्कंडे महाराजांच्या स्मारकाबाबत त्यांच्या बरोबर चर्चा केली होती. शिवाय या स्मारकासाठी मदत करावी असे आवाहन ही त्यांना केले होते. सोलापुरात पद्मशाली समाजाचा मोठा वर्ग वास्तव्यास आहे. सोलापूर जिल्ह्याला तेलंगणाची सीमा असल्याने तेलुगू भाषिक लोक देखील इथं जास्त राहतात. त्यावेळी रेड्डी यांनी या स्मारकासाठी इथल्या नागरिकांना आश्वास दिले होते.
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवत रेड्डी यांनी आपल्या आश्वासनाची आता पुर्तता केली आहे. त्यांनी सोलापुरात मार्कंडे महाराज यांच्या स्मारकासाठी तब्बल एक करोड रुपयांचा निधी जाहीर केला आहे. यामुळे सोलापुरातील पद्मशाली समाज, तेलगू भाषिक लोकांनी प्रचंड समाधान व्यक्त केले आहे. रेड्डी यांनी केलेल्या मदतीनंतर मार्कंडे महाराजांचे स्मारक उभारले जाईले. त्याचे काम ही लवकर सुरू होणार आहे अशी माहिती आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world