'त्यांनी ब्लॅकमेल केले, पैशाची मागणी केली' अडसूळ विरुद्ध राणा वाद पेटला

अडसूळ यांनी आपल्याला ब्लॅकमेल केले. जात पडताळणी प्रकरणात आपल्याकडे पैशांचीही मागणी केली. आता ते अमित शहा यांना ब्लॅकमेल करत आहेत असा गंभीर आरोप रवी राणा यांनी केला आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
अमरावती:

अमरावती लोकसभा मतदार संघातून नवनीत राणा यांचा पराभव झाला. मात्र त्या आधीपासूनच या मतदार संघात राणा विरूद्ध अडसूळ यांच्यात वाद होता. मात्र सर्व काही ठिक आहे असं वाटत असताना अमरावतीत गणित बिघडलं. नवनीत राणा यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागलं. या पराभवात शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांचा हात असल्याचा आरोप आता आमदार रवी राणा यांनी केली आहे. अडसूळ यांनी आपल्याला ब्लॅकमेल केले. जात पडताळणी प्रकरणात आपल्याकडे पैशांचीही मागणी केली. आता ते अमित शहा यांना ब्लॅकमेल करत आहेत असा गंभीर आरोप रवी राणा यांनी केला आहे. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला राज्यपालपदाचे आश्वासन दिले होते असा दावा आनंदराव अडसूळ यांनी केला आहे. त्या पार्श्वभूमिवर रवी राणा बोलत होते. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राणांचा अडसूळांवर हल्लाबोल 

आमदार रवी राणा यांनी आनंदराव अडसूळ यांच्या दाव्यानंतर त्यांच्यावर जोरदार टिका केली आहे. अडसूळ हे आपल्याला ब्लॅकमेल करत होते. शिवाय नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणात पैसेही मागत होते असा आरोप केला आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी नवनीत राणा यांचे काम करणार असल्याचा शब्द दिला होता. पण त्यांनी तो पाळला नाही. नवनीत राणा यांच्या पराभवासाठी त्यांनी संपूर्ण यंत्रणा राबवली.नवनीत राणा यांच्या पराभवात तेच कारणीभूत आहेत असा आरोपही त्यांनी केला. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  'शाह, फडणवीसांचे आश्वासन, आता खूप वेळ झाला, पंधरा दिवस थांबणार नाही तर...'

'अडसूळांना मानसिक उपचाराची गरज' 

आनंदराव अडसूळ यांना आता मानसिक उपचाराची गरज आहे. ते आधी आम्हाल ब्लॅकमेल करत होते. ते आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ब्लॅकमेल करत आहेत. त्यांचे मानसिक संतूलन बिघडले आहे. त्यामुळे त्यांना मानसिक उपचाराची गरज आहे. त्यासाठी लागणारा सर्व खर्च आपण करण्यास तयार असल्याचेही ते म्हणाले. त्यांना सध्या आरामाची गरज आहे असेही ते म्हणाले.

Advertisement

अडसूळांचा दावा काय? 

आनंदराव अडसूळ हे शिवसेना शिंदे गटाचे जेष्ठ नेते आहेत. लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदार संघ शिवसेनेला मिळावा अशी मागणी त्यांनी केली होती. नवनीत राणा यांच्या उमेदवारीला त्यांचा विरोध होता. मात्र त्यावेळी त्यांची समजूत काढण्यात आली. अमरावतीची जागा भाजपच्या ताब्यात गेली. तिथे राण यांचा पराभवही झाला. त्या वेळी अडसूळ यांना राज्यपालपदाचे आश्वासन देण्यात आले होते. हे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्याचा दावा त्यांनी केला. शिवाय तसाच शब्द देवेंद्र फडणवीस यांनीही दिला होता असेही त्यांनी सांगितले. पण याला आता खूप वेळ झाला आहे. आश्वासन पूर्ण झालेले नाही असे अडसूळ म्हणाले. 

Advertisement

'रवी राणांशी देणेघेणे नाही' 

विधानसभा निवडणुकीत अमरावती अमरावती जिल्ह्यातील तीन जागा मागू घेणार असल्याचे आनंदराव अडसूळ यांनी स्पष्ट केल. त्यात बडनेरा, तिवसा आणि दर्यापूर विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. या जागा या आधी शिवसेना लढली आहे. त्यामुळे त्या यावेळी मिळाल्याच पाहीजेत असा दबाव आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आणू असेही अडसूळ यावेळी म्हणाले. बडनेरामध्ये रवी राणा हे सध्या आमदार आहेत.ते महायुतीचा घटक आहेत. अशा वेळी रवी राणांशी आपलं काही देणेघेणे नाही असेच अडसूळ म्हणाले आहे. बडनेरा हा शिवसेनाला मिळालाच पाहीजे असा आपला आग्रह असल्याचे ते म्हणाले.