एकनाथ शिंदेंना नाराज आमदार दणका देणार? ठाकरेंच्या वक्तव्याने नागपूरचं वातावरण तापलं

काहींनी आपल्याला संपर्क केला असल्याचे संकेतही ठाकरे यांनी दिले. त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे खुले असतील का? याबाबत ही ठाकरे यांनी पहिल्यांदाच स्पष्ट वक्तव्य केलं आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
नागपूर:

मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महायुतीमध्ये नाराजी नाट्य रंगले आहे. त्यामध्ये आता उद्धव ठाकरे यांनी तडका मारत मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यांच्या फटाक्यां पेक्ष नाराजांचे बार जोरात उडत आहेत. लाडकी आमदार अशी काहीशी योजना जाहीर केले की काय असा प्रश्न त्यामुळे निर्माण होत आहे. त्यामुळे काहींचे आपल्याला खरोखर वाईट वाटतं असं ही ठाकरे म्हणाले. शिवाय जे नाराज आहेत, त्यांच्या पैकी काहींनी आपल्याला संपर्क केला असल्याचे संकेतही ठाकरे यांनी दिले. त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे खुले असतील का? याबाबत ही ठाकरे यांनी पहिल्यांदाच स्पष्ट वक्तव्य केलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

उद्धव ठाकरे यांनी आधी छगन भुजबळंच्या नाराजीबाबत वक्तव्य केलं. भुजबळांनी जहा नही चैना वहा नही रहना असं सुचक वक्तव्य केलं होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी भुजबळांचं आपल्याला खरोखर वाईट वाटतं. त्यांच्या बरोबर अनेकांचं वाईट वाटतं आतमधून वाटत आहे.काहींनी शिवून ठेवलेली पण, घट्ट झालेली जॅकेट घालण्याची संधी मिळाली. काहींना लाडक्या आमदार योजनेचा फायदा झाला. पण अनेकांना संधी मिळाली नाही. भुजबळ म्हणतात जहा नही चैना, पण मी म्हणेन या सरकारची झालीय दैना असा टोला ठाकरे यांनी लगावला. शिवाय भुजबळे हे आपल्या आता संपर्कात नाहीत. पण ते नियमित कोणत्याना कोणत्या कारणाने संपर्कात असता असंही ते म्हणाले.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - लाडकी बहीण योजनेबाबत उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य, थेट महायुतीवर निशाणा

मंत्रिपदाचा कार्यकाळ हा अडीच वर्षाचा असेल असं सांगितलं जात आहे. म्हणजे हा मंत्रिमंडळाचा फिरता चषक आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मंत्रिपद फिरते ठेवणार मग उपमुख्यमंत्रिपदही फिरतं ठेवणार. की नेतेच आपल्या खुर्च्या बळकट करणार अशी विचारणाही त्यांनी केली. ज्यांच्या जोरावर हे आले ते फिरते आणि नेत्यांच्या खुर्चा मात्र फिक्स असं काही ठरलं आहे का असंही ते म्हणाले. म्हणजे सहकाऱ्यांच्या खुर्च्या फिरत्या ठेवणार. त्यांच्यात अस्थिरता ठेवणार अशी स्थिती दिसत असल्याचंही ते म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Chhagan Bhujbal : "प्रश्न मंत्रिपदाचा नाही", छगन भुजबळांना सांगितलं नाराजीचं खरं कारण

एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना नाही. ती एशिंशी आहे, असा उल्लेख त्यांनी केला. तिकडे आता अनेकांची नाराजी समोर येत आहे. त्यांनाही आता काही वेगळे अनुभव येत आहेत. ते अनुभव त्यांना आत घेतले पाहीजेत. त्यातून काहींनी संपर्कही केला आहे. काहींचे निरोप येत आहेत. तुम्ही जे केलं ते बरोबर होतं असंही काही सांगत आहे. त्यामुळे अनुभवा पेक्षा उत्तम गुरू नसतो. त्यामुळे त्यांना धडा शिकू द्या. त्याचे प्रमाणपत्रही त्यांना मिळू द्या असंही ठाकरे म्हणाले. पण त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे खुले असतील का असा प्रश्न त्यांना करण्यात आला. त्यावर त्यांच्यात किती सुधारणा होते ते बघू मग ठरवू असं उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे विधानसभेत पडसाद, विरोधकांच्या निशाण्यावर असलेला वाल्मिक कराड कोण?

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवरही टीका केली. ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र असं फडणवीस म्हणाले होते. त्यावर ठाकरे ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट फॉर मशिन असं म्हटत बॅलेटवरच मतदान झालं पाहीजे अशी मागणी केली. सरकार बॅलेटवर मतदान घेण्यास का घाबरत आहे अशी विचारणाही त्यांनी केली. मतदानाची प्रक्रीया ही पारदर्शी होत नाही तोपर्यंत एक देश एक निवडणूक नको अशी भूमीकाही त्यांनी मांडली. शिवाय जो निकाल महाराष्ट्रात लागला तो जनतेला पटलेला नाही असंही ते म्हणाले.