शिंदेंना शह देण्यासाठी पडद्यामागे मोठ्या घडामोडी, उद्धव ठाकरेंनी केला CM फडणवीसांना संपर्क? पाहा व्हिडीओ

शिंदेंच्या शिवसेनेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांशी चर्चा केल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधल्याचं बोललं जात आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
Uddhav Thackeray Contacts CM Devendra Fadnavis
मुंबई:

Mumbai Mayor Latest News : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल नुकताच पार पडला. या महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू भाजप-शिवसेना युतीचा पराभव करतील,असा कयास लावला जात होता. परंतु, महायुतीने 118 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं आणि या महापालिकेवर जवळपास 3 दशकानंतर विजय मिळवला. मुंबईचा महापौर भाजपचाच होणार,अशी तुफान चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपने 89, तर शिवसेना शिंदे गटाने 29 जागा जिंकल्या आहेत. परंतु, सत्ता स्थापनेआधीच शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजपवर दबाव टाकण्यात आल्याचं समजते. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांशी चर्चा केल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधल्याचं बोललं जात आहे. 

उद्धव ठाकरे गट आणि भाजप यांच्यात पडद्याआड चर्चा

मुंबईत महापौरपदाच्या शर्यतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोडाफोडीच्या राजकारणास शह देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून उद्धव ठाकरे गट आणि भाजप यांच्यात पडद्याआड चर्चा झाल्याचं समजते.महापौर निवडीवेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे 65 नगरसेवक अनुपस्थित राहतील,अशी योजना आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिंदे गटाने ठाकरेंचे नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.त्याला प्रत्युत्तर म्हणून हे पाऊल उचललं जातंय. मुंबईत एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या 12 नगरसेवकांना फोडण्याची तयारी केल्याचं समजते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतरच पडद्यामागील हालचालींना मोठा वेग आलेला आहे.

नक्की वाचा >> नवनीत राणांची भाजपमधून हकालपट्टी होणार? भाजपच्या 22 उमेदवारांचं फडणवीसांना पत्र, अमरावती महापालिकेत भलताच गेम

शिंदेंना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपची खेळी

एका बाजूला एकनाथ शिंदे यांच्याकडून दबाव वाढवला जात आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने शिंदेंच्या ऐवजी ठाकरेंच्या नगरसेवकांशी थेट संपर्क सुरू केल्याची माहिती आता समोर येतेय. शिवसेना ठाकरे गट आणि भाजप यांच्याकडून याबाबत कोणताही दुजोरा दिला जात नाहीय. शिंदेंच्या नेहमीच्या दबावाला प्रत्युत्तर म्हणून भाजपची ही खेळी असल्याचं म्हटलं जातंय. भाजप आणि ठाकरेंमधील चर्चा पडद्यामागे सुरु झाल्याचं बोललं जातंय. शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी करणं, हा यामागचा हेतू असू शकतो. जास्त जागा किंवा पद मिळवण्यासाठी शिंदे गटाकडून दिल्लीवारी केली जाते. ते नेहमी अशाप्रकारची रणनीती आखतात. या गोष्टींना प्रत्युत्तर म्हणून भाजपची ही खेळी आहे की काय? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. 

नक्की वाचा >> BMC Mayor Election : 'Mumbai Boss' चा सस्पेन्स कधी संपणार? कशी असते महापौरपदाची लॉटरी सिस्टम? वाचा सर्व माहिती