विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे. महायुतीचे संख्याबळ लक्षात घेता त्यांचे 9 उमेदवार सहज निवडून येवू शकतात. तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार सहज जिंकतील अशी स्थिती आहे. असा स्थितीत आता शिवसेना ठाकरे गटाने या निवडणुकीत उमेदवार उतरवणार अशी भूमीका घेतली आहे. असं करत असताना त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना पाठिंबा देण्यासही नकार दिल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून समजते. तर राष्ट्रवादी काँग्रेसने शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा देवू केला आहे. अशा स्थिती आघाडीत बिघाडी होते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिवसेना ठाकरे गट रिंगणात उतरणार
महाविकास आघाडीचे दोन उमेदवार विधान परिषदेत सहज विजयी होवू शकतात येवढे संख्याबळ त्यांच्याकडे आहे. त्या काँग्रेसचे संख्याबळ पाहाता त्यांचा एक उमेदवार विजयी होईल. तर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट मिळून एक उमेदवार विधान परिषदेत जावू शकतो. पण शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा देण्यास शिवसेना ठाकरे गटाने नकार दिला आगे. तिसरा उमेदावर आपण मैदानात उतरवणार असल्याचे शिवसेनेनं स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरे यांनीच याबाबत स्पष्ट केले आहे. आमच्याकडे आकडे आहेत. आम्ही गणित जळवून आले आहे. त्यामुळे आमचे तीन उमेदवार निवडून येतील असे ठाकरे म्हणाले होते. शिवसेना आपला उमेदवार रिंगणात उतरवेल असेही ते म्हणाले. शिवाय रायगड आणि मावळ लोकसभेत शेकापने मदत न केल्याचा आरोप शिवसेनेचा आहे. त्यामुळे त्यांना मदत करू नये अशी भूमीका शिवसेनेनं घेतली आहे. शिवाय अनंत गिते यांनीही शेकापला विरोध दर्शवला आहे.
ट्रेंडिंग बातमी - अर्थसंकल्पात बड्या घोषणांची शक्यता? कोणाच्या पदरात काय पडणार?
राष्ट्रवादीचा शेकापला पाठींबा
शिवसेना ठाकरे गटाने वेगळा उमदेवार देण्याचा निश्चय केला गेला. असे असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने मात्र शेकापच्या जयंत पाटील यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी होते की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे संख्याबळ पाहाता जयंत पाटील यांना निवडून येण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाची मदत लागणार आहे. तर काँग्रेसचा एक उमेदवार सहज पणे निवडून येवू शकतो. काँग्रेसकडून अल्पसंख्याक नेत्याला संधी दिली जावू शकतो.
ट्रेंडिंग बातमी - राष्ट्रवादीत काय चाललंय? अजित पवारांच्या आमदारांची बंद दाराआड जयंत पाटलांशी चर्चा
विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध नाहीच?
विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 11 जागांवर निवडणूक होवू नये यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र असं असताना शिवसेना ठाकरे गटाने अतिरीक्त उमेदवार देण्याचे निश्चित केले आहे. महाविकास आघाडीकडून मित्रपक्ष असलेल्या जयंत पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी योजना होती. त्याला शरद पवार गटाने पाठिंबा ही दिला आहे. मात्र शिवसेनेनं त्याला नकार दिला असल्याने जयंत पाटील यांचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. शिवाय जर अतिरीक्त उमेदवार रिंगणात असेल तर निवडणूक होणार हे निश्चित आहे. त्यात ठाकरे यांनी सत्तापक्षातील काही नेते संपर्कात असल्याचे सांगत तिसरा उमेदवार निवडून आणू असेही सांगितले होते.