जाहिरात
Story ProgressBack

अर्थसंकल्पात बड्या घोषणांची शक्यता? कोणाच्या पदरात काय पडणार?

लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला जोरदार फटका बसला होता. त्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात लोकप्रिय आणि बड्या घोषणा केली जाण्याची दाट शक्यता आहे.

Read Time: 2 mins
अर्थसंकल्पात बड्या घोषणांची शक्यता? कोणाच्या पदरात काय पडणार?
मुंबई:

राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आज शुक्रवारी दुपारी विधानसभेत मांडतील. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला जोरदार फटका बसला होता. त्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात लोकप्रिय आणि बड्या घोषणा केली जाण्याची दाट शक्यता आहे. महिला, तरूणी, शेतकरी आणि मध्यमवर्गीयांना खूष करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून सरकार करण्याचीही शक्यता आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आजच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी काय? 

अजित पवार सादर करणाऱ्या अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष योजनांची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. यातून महिलांना महायुतीकडे आकर्षित करण्याची रणनिती महायुतीची आहे. त्यानुसार 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेची घोषणा होवू शकते. या योजने नुसार प्रत्येक महिलेच्या खात्यात 1500 रूपये जमा केले जातील. या योजनेचा लाभ 21 ते 60 वयोगटातील महिलां होणार आहे. राज्यातल्या 3 कोटी पेक्षा जास्त महिलांना याचा लाभ होणार आहे. मध्य प्रदेशात ही योजना गेम चेंजर ठरली होती. त्या धर्तीवरच आता युती सरकारने ही योजना लागू करण्याची रणनिती आखली आहे.त्याची घोषणा होण्याची चर्चा जोरात आगे.    

ट्रेंडिंग बातमी - राष्ट्रवादीत काय चाललंय? अजित पवारांच्या आमदारांची बंद दाराआड जयंत पाटलांशी चर्चा

गॅस सिलेंडरबाबत मोठा निर्णय 

गॅस दरवाढीचा फटका नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसला. गॅस दरवाढी मुळे महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. सतत दर वाढत असल्याने महिन्याच्या बजेटवर त्याचा परिणाम होत होता.अशा स्थिती राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार वर्षाला 3 सिलेंडर मोफत दिले जातील. याचा फायदा राज्यातल्या दोन कोटी कुटुंबाना होणार आहे. या निर्णयामुळे महिलांना काही अंशी तरी दिलासा मिळेल. त्याची घोषणाही या अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Exclusive : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं नाही, भाजपाच्या बड्या नेत्यानं सांगितला प्लॅन

शेतकऱ्यांसाठी काय?

महिलां बरोबरच शेतकरी वर्गावरही या अर्थसंकल्पात लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. सततची नापिकी, अवकाळी, खतांचा तुटवडा, हमीभाव नसणे, कांदा निर्यात बंदी यामुळे शेतकरी वर्गातही सरकार विरोधात असंतोष आहे. तो कमी करण्याचा प्रयत्न सरकार या अर्थसंकल्पातून करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही खूष करणाऱ्या घोषणा होवू शकतात. त्यात मोफत वीजेची घोषणा केली जावू शकते. त्याचा फायदा छोट्या आणि मध्यम कृषी पंपासाठी होईल. 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांना ही मोफत वीज दिली जाईल. याचा खेट फायदा अल्पभूधारक, मध्यम भूधारक अशा 44 लाख शेतकऱ्यांना होईल. त्याच बरोबर 8.5 लाख शेतकऱ्यांना मोफत सौर पंप दिले जातील. याचीही घोषणा आजच्या अर्थसंकल्पात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
विधानसभेत आज काय काय होणार? विरोधक सत्ताधाऱ्यांना 'या' मुद्द्यांवर भिडणार
अर्थसंकल्पात बड्या घोषणांची शक्यता? कोणाच्या पदरात काय पडणार?
What happened on the steps of the Vidhan Bhavan when the opposition rulers faced each other?
Next Article
विरोधक सत्ताधारी आमने-सामने, विधानभवनाच्या पायऱ्यांवर काय झालं?
;