विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेच्या तयारीला लागले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वॉर्डनिहाय आढावा उद्धव ठाकरे घेणार आहेत. मुंबईतील विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश मातोश्रीवरुन देण्यात आले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आजपासून मातोश्रीवर ठाकरे गटाच्या बैठकांचा सत्र सुरु होणार आहे. 26, 27, 28 आणि 29 डिसेंबरपर्यत उद्धव ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. विधानसभा निहाय या बैठका होणार असून स्वतः उद्धव ठाकरे बैठकीच्या माध्यमातून आढावा घेणार आहेत.
(नक्की वाचा- Room No. 602 : काय आहे मंत्रालयातील रहस्यमय रुमची गोष्ट? ते दालन घेण्यास मंत्री का घाबरतात?)
21 डिसेंबर रोजी मुंबईतील निरीक्षकांची बैठक पार पडली होती. त्यानंतर आता पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुंबईत विधानसभा निहाय निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी वार्डनिहाय शाखाप्रमूख ते विभागप्रमुखांशी बातचीत केली होती. त्यानंतर या निरीक्षकांनी अहवाल उद्धव ठाकरे यांच्याकडे 21 तारखेच्या बैठकीत सादर केला होता.
आगामी मुंबई महानगरपालिका ठाकरे गटाने स्वबळावर लढावी, असं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. यासाठी उद्धव ठाकरे स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बातचीत करणार आहेत. या बैठकीसाठी विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश मातोश्रीवरुन देण्यात आले आहेत. या बैठकीत महानगरपालिकेच्या तयारीचा आढावा तसेच जानेवारी महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या शाखा भेटीचे आयोजन करण्यासंदर्भात देखील चर्चा करण्यात येणार आहे.
( नक्की वाचा : राज्यमंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणतं खातं कुणाकडं? वाचा सर्व माहिती )
कसं असेल बैठकांचं वेळापत्रक?
- 26 डिसेंबर - बोरिवली विधानसभा, दहिसर विधानसभा, मागाठाणे विधानसभा, दिंडोशी, चारकोप, कांदिवली आणि मालाड विधानसभा.
- 27 डिसेंबर - अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, विलेपार्ले, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, चांदिवली, कुर्ला, कलिना विधानसभा.
- 28 डिसेंबर -मुलुंड, विक्रोळी, भांडुप, मानखुर्द - शिवाजीनगर, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, अनुशक्तीनगर, चेंबूर, सायन कोळीवाडा.
- 29 डिसेंबर - धारावी, वडाळा, माहीम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुबादेवी, कुलाबा.