Uddhav Thackeray Speech : "देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. ही लढाई तुम्ही फार उत्तम पद्धतीने लढलात. जो आभास किंवा चित्र निर्माण केलं गेलं की शिवसेना संपली. ठाकरे नाव पुसून टाकणार. त्यांना तुम्ही रोखलंत. हे फक्त महाराष्ट्र करू शकतो. संपूर्ण महाराष्ट्र यांना वेगळ्या पद्धतीने पादाक्रांत करायचे. महाराष्ट्र गिळायचाय..आपण ही लढाई कशी दिली..यावेळी मुंबई पहिल्या प्रथम पैशांचा वापर केला गेला. दार बंद असलं तरी दाराच्या फटीतून पैसे फेकलेले लिफाफे फेकले गेले. तुम्ही महाराष्ट्र विकत घेत आहात. मत विकत घ्याल पण मन कसं विकत घ्याल? ठाकरे नाव पुसून टाका मग बघा आयुष्यात काय होतंय? आयुष्यातून शिवसेना काढून टाका. ठाकरे नाव पुसून टाका.मग मुंबई आणि महाराष्ट्राचा विचार करा", अशी उपरोधित टीका उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर केली. ते बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात बोलत होते.
"ठाकरे नाव पुसायला अनेक जण आले, पण.."
"तुम्हाला आश्चर्य वाटेल लहान असताना आपण बहुतेक सर्वजण शाळेत पहिले काही दिवस आनंदाने गेलो असेल, असे काही लोक असतील. मी पण तसाच होतो. शाळेला दांडी मारायची असल्यास मी माँ चा आधार घेत नव्हतो. बाळासाहेबांकडे जाऊन घट्ट मिठी मारायचो. मग त्यांच्या लक्षात यायचं. माँ पाठोपाठ यायची. वेळ होत चालली, शाळेला जायचंय पण अजून हा तयार होत नाही. जाऊदे गं एक दिवस शाळेत गेला नाही तर काय होतंय. त्यांच्यासाठी ते बरोबर होतं. त्यांना स्वत:ला आणि आजोबाला परिस्थितीनुसार शाळा सोडावी लागली. पण त्यांनी एवढं कतृत्व उभं केलंय की ते ठाकरे नाव पुसायला अनेक जण इकडे उतरत आहेत. पण अजून ते नावच पुसले जात नाहीय",असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
नक्की वाचा >> राज्यभरात या लग्नाची चर्चा! फक्त 150 रुपयांत पार पडलं माजी आमदार कन्येचं लग्न, नवरा-नवरीने घेतला मोठा निर्णय
"शिवाजी महाराजांचा इतिहासा आपण बघितला, तर.."
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, "असं काय ते वेगळं रसायन होतं..आणि त्यांचे आम्ही वारसदार. घराणेशाही म्हणायचं तर म्हणा..मला घराणेशाही आणि परंपरेचा अभिमान आहे. ते माझं भाग्य आहे.जे विरोधक आहेत, त्यांना त्यांच्या वडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते, त्याला मी काही करू शकत नाही. जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो, महाराष्ट्र धर्माचा विचार करतो. तेव्हाचा शिवाजी महाराजांचा इतिहासा आपण बघितला, तर गद्दारी हा विषय आजचा नाहीय.गद्दारी हा विषय पूर्वापार चालत आलेला आहे. तो आपल्याला शापच लाभलेला आहे.जेव्हा विजय अशक्य असतो,तेव्हा आपला शत्रू गद्दारांची मदत घेत असतो. गद्दारी आजपर्यंत भगव्याशी झाली नसती,तर अतिशयोक्ती वाटेल. पण या महाराष्ट्राने जगाचा इतिहास बदलून दाखवला असता".