जाहिरात

Border 2 Review: देशभक्तीला सलाम, सनी देओलची डरकाळी, अन् वरूण धवनचं रौद्ररूप..कसा आहे 'बॉर्डर 2' चित्रपट? वाचा

सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी, सोनम बाजवा, मेधा राणा आणि मोना सिंग स्टारर बॉर्डर 2 चित्रपट सिनेमागृहांत प्रदर्शीत झाला आहे. चित्रपटाचा रिव्हूय वाचा सविस्तरपणे..

Border 2 Review: देशभक्तीला सलाम, सनी देओलची डरकाळी, अन् वरूण धवनचं रौद्ररूप..कसा आहे 'बॉर्डर 2' चित्रपट? वाचा
Border 2 Movie Review
मुंबई:

Border 2 Review:  सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी, सोनम बाजवा, मेधा राणा आणि मोना सिंग स्टारर बॉर्डर 2 चित्रपट सिनेमागृहांत प्रदर्शीत झाला आहे.अनुराग सिंग यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या या चित्रपटाची देशभरात चर्चा रंगली आहे. ‘बॉर्डर 2' हा चित्रपट 1997 मध्ये पडद्यावर झळकलेल्या ‘बॉर्डर'चित्रपटाचा सिक्वल आहे.पण यावेळी स्टारकास्टमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. इतकच नव्हे, तर या चित्रपटाची कथाही नव्या रुपात मांडली आहे. ‘बॉर्डर 2' चित्रपटातील गाणे आणि ट्रेलर प्रचंड गाजला आहे. परंतु, चित्रपटाचा प्रोमो समोर आला, तेव्हा वरुण धवनच्या अभिनयावर खूप टीका झाली होती.पण आज हा चित्रपट प्रदर्शीत झाला असून या चित्रपटाचा रिव्ह्यू नेमका कसा आहे, याबाबत सविस्तर माहिती वाचा.  

कशी आहे बॉर्डर 2 ची कथा?

‘बॉर्डर 2' ची कथा 1960 ते 1970 च्या दशकावर आधारित आहे. ही कथा 1971 च्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर घडते. चित्रपटाच्या पहिल्या सीनपासून ते शेवटच्या सीनपर्यंत सनी देओल झळकलेले पाहायला मिळतात. या चित्रपटाच्या कथेत भारताच्या तिन्ही सैन्य दलांच्या शौर्याचा गौरव दाखवण्यात आला आहे.चित्रपटाचा पहिला भाग भावनिक असून त्यात कुटुंबातील घडामोडींवर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे.तर दुसरा भाग पूर्णपणे युद्धावर आधारित आहे. चित्रपटाच्या शेवटी वरुण धवन आणि सनी देओल अक्षरशः धुमाकूळ घालताना दिसतात. 

नक्की वाचा >> नवी मुंबईत ड्रग्ज विक्रीचा सुळसुळाट! आंतरराज्यीय ड्रग रॅकेटचा पर्दाफाश, मुख्य सूत्रधार पोलिसांच्या जाळ्यात

‘बॉर्डर 2' दिग्दर्शन

अनुराग सिंग यांनी ‘बॉर्डर 2' चे दिग्दर्शन अतिशय प्रगल्भतेने केले आहे. त्यांनी अॅक्शन आणि भावना यांचा जबरदस्त कॉम्बिनेशन या चित्रपटात दाखवला आहे. प्रेक्षकांच्या मनाला भावनारा हा चित्रपट आहे. चित्रपट पाहिल्यानंतर एका प्रेक्षकाने म्हटलंय की, पहिला भाग थोडा संथपणे जाऊ शकतो,असं मला वाटलं होतं. कदाचित कौंटुबीक नाट्य जास्त प्रमाणात दाखवण्यात आलंय. पण अनुराग सिंग यांनी सैनिकांचे जीवन आणि त्यांची कथा ज्या पद्धतीने दाखवल्या आहेत,त्या मनाला चटका देऊन जाणाऱ्या आहेत. चित्रपटाची हीच बाजू तमाम प्रेक्षकांची मने जिंकते. कारण सैनिकांची कहाणी फक्त त्यांची नसते, तर ती त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची असते.

‘बॉर्डर 2' अभिनय

‘बॉर्डर 2' चित्रपटात सनी देओल यांनी अप्रतिम अभिनयाची झलक तर दाखवलीच आहे. पण इतर कलाकारांनीही उत्कृष्ट अभिनय करून चित्रपटाची शोभा वाढवली आहे. सनी देओल नेहमीच धडाडीचं अभिनय करतात आणि चित्रपटाचा भार आपल्या खांद्यावर सहजपणे वाहून नेतात. हेच या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे.

नक्की वाचा >> राज्यभरात या लग्नाची चर्चा! फक्त 150 रुपयांत पार पडलं माजी आमदार कन्येचं लग्न, नवरा-नवरीने घेतला मोठा निर्णय

चित्रपटात वरुण धवननेही त्याच्या इतर चित्रपटांपेक्षा खूप चांगले काम केले आहे. चित्रपटाच्या रिलीजपूर्वी त्याची खिल्ली उडवली जात होती,पण वरुणने दमदार अभिनय करून ट्रोलर्सला चुकीचं ठरवलं आहे. दिलजीत दोसांझ यांनीही प्रेक्षकांची मने जिंकण्यात यश मिळवले आहे.मेधा (निधी) राणा हिचाही अभिनय प्रभावी आहे आणि तिची हरियाणवी स्टाईल अगदी दमदार वाटते.

  • सनी देओलचे चाहते असाल तर ही फिल्म नक्की पाहण्यासारखी आहे.
  • ‘बॉर्डर' सिरीजचे फॅन असाल तर कुठल्याही परिस्थितीत चुकवू नका.
  • इमोशन आणि अॅक्शनचा कॉकटेल असलेली वॉर फिल्म आवडत असेल तर ही नेमकी तुमच्यासाठीच बनली आहे.
  • 26 जानेवारीच्या निमित्ताने रिलीज होणारा ‘बॉर्डर 2' हा या प्रसंगासाठी एकदम योग्य चित्रपट आहे.
  • बॅलन्स्ड वॉर मूव्ही, उत्कृष्ट अभिनय आणि परिपक्व दिग्दर्शन यासाठी हा चित्रपट किमान एकदा तरी पाहावा.

रेटिंग: 3.5/5
दिग्दर्शक: अनुराग सिंग
कलाकार: सनी देओल, वरुण धवन, अहान शेट्टी, दिलजीत दोसांझ, मेधा राणा, मोना सिंह आणि सोनम बाजवा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com