आपण हिंदूत्व सोडलं याचा मोठ्या प्रमाणात प्रचार भाजपनं विधानसभा निवडणुकीत केला असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. शिवाय उद्धव ठाकरे यांनी बाबरी पाडली त्याबाबत माफी मागितली असं घरोघरी जावून भाजपच्या लोकांनी सांगितलं असं उद्धव म्हणाले. पण हे खोटं कसं होतं हे सांगताना उद्धव ठाकरे यांनी भाजपलाच आरसा दाखवला. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने आयोजित शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उद्धव यांनी भाजपवर गंभीर आरोप करत हिंदूत्व कोणी सोडलं? ऐन वेळी पळ कुणी काढला? याचाच उलगडा या मेळाव्यात त्यांनी केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
आपण हिंदूत्व सोडलेलं नाही. जर तुम्हाला वाटत असेल मी हिंदूत्व सोडलं तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. बाबरी पाडल्याबाबत माफी मागीतली असं चित्र घरोघरी जावून रंगवलं गेलं. पण 92-93 च्या दंगलीनंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी माफी मागितली होती. बाबरी पाडली ही मोठी चुक होती असं लालकृष्ण अडवाणी म्हटले होते. असा खळबळजनक आरोप उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. आपण कधी ही माफी मागितली नव्हती असं ही ते म्हणाले. मोहन भागवत हे मस्जिदीत गेले होते. मी कधीही मस्जिदीत गेलेलो नाही. मोदी नवाज शरीफ यांचा केक खायला गेले होते. याची आठवणच ठाकरे यांनी करून दिली. अशा लोकांनी आम्हाला हिंदूत्व शिकवू नये असंही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांचे आगामी निवडणूकांत स्वबळाचे संकेत पण...
यावेळी त्यांनी आणखी एक दाखला देत भाजपच्या हिंदूत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. विलेपार्लेची निवडणूक ही धर्माच्या नावावर लढवली गेली होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी हिंदूत्वावर ही निवडणूक लढवली होती. काँग्रेस विरोधात ही निवडणूक शिवसेना जिंकली होती. त्यावेळी शिवसेनाला अपशकून करण्याचं काम भाजपनं त्यावेळी केलं होतं. पण ज्यावेळी शिवसेना ही निवडणूक हिंदुत्वावर लढली त्यावेळी भाजपचे लोक मातोश्रीचे उंबरठे झिजवत होते याची आठवण ठाकरे यांनी यावेळी करून दिली. भाजप आणि आरएसएस हे फक्त काड्या लावण्याचे काम करतात. नंतर ते पळून जातात ही त्यांची सवय आहे असा हल्लाबोलही ठाकरे यांनी यावेळी केला.
बाबरी पाडल्यानंतर ती आम्ही नाही पाडली असं म्हणणारे भाजपचेच नेते होते. ही खरी नामर्दाची औलाद आहे असा घणाघात त्यांनी केला. बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेण्यात आला त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांचेच सरकार होते. भुजबळांनी बाळासाहेबांना अटक करायचे ठरवले होते. त्यावेळीही उपपंतप्रधान आणि गृहमंत्री हे लालकृष्ण अडवाणी होते. त्यंनी त्यावेळी केंद्रीय पोलिस महाराष्ट्रात पाठवले होते. पण त्यांनी बाळासाहेबांना कोणतीही मदत केली नव्हती असंही उद्धव यांनी यावेळी सांगितलं.
गद्दारी फोडाफोडीचे बीज हे भाजप आणि जनसंघात होते असंही ते म्हणाले. ज्यावेळी शरद पवारांनी पुलोदचं सरकार बनवलं होतं त्यावेळी जनसंघाचे एक मंत्री ही होते याची आठवण त्यांनी करून दिली. शिवाय जनसंघान जनतादल फोडण्याचा ही प्रयत्न केला होता हे सांगायला ही ठाकरे विसरले नाहीत. दरम्यान राममंदीर अजूनही अपूर्ण आहे. आमच्या मनात रामा बद्दल श्रद्धा आहेच. पण छत्रपती शिवराय हे आमचे दैवत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रा आल्यावर आधी जय शिवराय बोलायचं नंतर जय श्रीराम बोलायचं असं ही उद्धव ठाकरे म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world