उद्धव ठाकरे यांनी हंबरडा मोर्चातून महायुती सरकावर जोरदार हल्लाबोल केला. या मोर्चात त्यांनी पुन्हा एकदा पन्नास खोकेचा उल्लेख करत एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये द्या. 50 खोके घेतले आता 50 हजार हेक्टरी द्या अशी मागणी उद्धव ठाकरेंची सरकारकडे केली. या निमित्ताने त्यांनी शिंदेंना चिमटे काढण्याची संधी ही सोडली नाही. शिवाय खरडून गेलेल्या शेतीसाठी दिवाळीआधी एक लाख द्या, असं आवाहन ही ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. याच वेळी त्यांनी एक मोठी घोषणा ही केली आहे. दिवाळीनंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांना भेटणार असल्याचं ते म्हणाले. शिवाय दिलेली मदत शेतकऱ्याला मिळाली की नाही याची विचारणा ही करणार असल्याचं उद्धव यांनी यावेळी सांगितलं.
विरोधीपक्षनेतेपद जर संख्याबळाअभावी देता येत नाही, मग असंविधानिक असलेले दोन उपमुख्यमंत्री कसे नेमता? असा सवाल ही या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी केला. आम्ही उपमुख्यमंत्रिपद मानत नाही असं ही ते म्हणाले. एका शेतकऱ्यांने हातात टरबूज दिले. जमिनीची काय हालत आहे हे सांगितले. मुख्यमंत्री म्हणतात जमीन खरडून गेल्यावर साडेतीन लाख देऊ. तुमची नियत असेल तर दिवाळीपूर्वी साडेतीन लाखपैकी 1 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात टाका असे ठाकरे यावेळी म्हणाले.
नक्की वाचा - Viral video: ही अमेरिकन महिला म्हणते भारतात अजिबात जाऊ नका, कारण ऐकून धक्का बसेल
देशाचे पंतप्रधान मुंबईत येऊन गेले. त्यांच्या भाषणात एकदाही शेतकरी उल्लेख होता का? असा प्रश्न त्यांनी केला. त्यांना महाराष्ट्राच्या परिस्थितीची जाण नाही, एक फुल आणि दोन हाफ सत्तेत बसले आहे. ज्यांनी 50 खोके घेतले त्यांच्याकडे आपण 50 हजार मागत आहे, त्यांना तसं कळणार नाही, हातात आसूड घ्यावे लागेल असा टोला त्यांनी शिंदेंनाही लगावला. मी संभाजीनगर शहरात आल्यावर मोठं मोठे होर्डिंग पाहिले. त्यावर शेतकरी फोटो नाही तर सतरंज्या उचलणाऱ्यांचे फोटो आहेत. बोलणारे काही बोलू दे, ज्यावेळी तुमच्यावर संकट येईल त्यावेळी शिवसेना तुमच्या सोबत येईल असं ही ते म्हणाले.
50 हजार हेक्टर मदत मिळाली पाहीजे हे मला स्वप्नं नाही पडले. ती शेतकऱ्यांची मागणी आहे असंही ते म्हणाले. आम्हाला पद द्या किंवा देऊ नका आम्हाला फरक पडत नाही. आम्ही तुमच्या बोकांडी बसतोच असा इशारा ही त्यांनी दिला. मोदी म्हणाले होते हे लोग मंगल सूत्र चुरा लेगे, पण आमचे मंगल सूत्र विकण्याची वेळ आली आहे. जर कोणता अधिकारी मस्तीत वागला तर शेतकरी आसूड त्यांना दाखवावा लागेल. जे जाहीर केले ते दिवाळी आधी द्या, त्यानंतर शेतकरी गावात जाऊन मदत मिळाली का विचारणार असं ही ते म्हणाले. शेतकऱ्यांना पॅकेज मिळवून देण्याचे काम शिवसैनिकांचे आहे. बिहारला मदत केली, माझ्या महाराष्ट्राने काय केले. Pm फडातून शेतकऱ्यांना 10 हजार रुपये हे का टाकत नाही अशी विचारणाही त्यांनी केला.