जाहिरात

Arun Gawli: निवडणुकीपूर्वी अरूण गवळीचा मोठा निर्णय, दोन्ही मुली निवडणूक लढवणार; बायकोकडे मोठी जबाबदारी

Gita Gawli Interview: गीता गवळी यांनी एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, आम्ही हिंदू आहोत, पण आमचा पक्ष सगळ्यांसाठी आहे

Arun Gawli: निवडणुकीपूर्वी अरूण गवळीचा मोठा निर्णय, दोन्ही मुली निवडणूक लढवणार; बायकोकडे मोठी जबाबदारी
Gita Gawli Insta
मुंबई:

गँगस्टर आणि माजी आमदार अरुण गवळीच्या राजकीय कारकिर्दीबाबत गीता गवळी यांनी नवी माहिती दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असून या निवडणुकांमध्ये अरुण गवळी काय भूमिका बजावणार याची उत्सुकता लागली आहे. गीता गवळी यांनी आपण मुंबई महापालिका निवडणूक लढवणार असून आपली बहीणही निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले आहे. अरूण गवळी याने अखिल भारतीय सेना नावाचा पक्ष काढला होता. याच पक्षातर्फे तो आमदारही झाला होता. गीता गवळी याच पक्षातर्फे नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. 

नक्की वाचा: मोठी बातमी! 'या' आमदाराची होणार राष्ट्रवादीतून हकालपट्टी? पक्षाने नोटीस पाठवली

'हिंदू डॉन' प्रतिमेचा अडसर नाही

गीता गवळी यांनी एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, आम्ही हिंदू आहोत, पण आमचा पक्ष सगळ्यांसाठी आहे आणि आमच्यासाठी सर्व लोक सारखे आहेत. अरुण गवळी याची इमेज 'हिंदू डॉन' म्हणून तयार करण्यात आल्याने त्याचा निवडणुकीवर काही परिणाम होईल का असा प्रश्न विचारला असता गीता गवळी यांनी हे उत्तर दिले.  भायखळा मतदारसंघात 70 टक्के मुस्लिम मतदार आहेत, मलाही मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले आहे असे गीता गवळी यांनी म्हटले. अरुण गवळीला मुस्लिम समाज आजही मानतो असे गीता गवळींचे म्हणणे आहे. आपल्या वडिलांनी या मतदारसंघातील शौचालयाचा प्रश्न सोडवला, मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न सोडवला, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला, यामुळे मतदार आमच्या पाठीशी असल्याचे गीता गवळींनी म्हटले आहे. मदनपुऱ्यात अरुण गवळीने आमदार असताना सर्वाधिक निधी दिल्याचेही गीता गवळी यांचे म्हणणे आहे. 

आशा गवळींकडे मोठी जबाबदारी

अरुण गवळीची पत्नी आशा गवळी यांच्याकडे पक्षाच्या प्रचाराची आणि विस्ताराची जबाबदारी देण्यात आली आहे. गीता गवळी आणि त्यांची बहीण योगिता गवळी या दोघीजणी महापालिका निवडणूक लढवणार आहे. गीता गवळी यांना हिंदू डॉनची प्रतिमा आणि मुस्लिमांचा पाठिंबा याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला धरून मुलाखतरकर्त्याने गीता गवळी यांना म्हटले की, 'तुम्ही उत्तर देताना आशा गवळी या पूर्वी मुस्लिम होत्या याबद्दलचा उल्लेख कराल असे वाटले होते.' यावर गीता गवळी यांनी म्हटले की, लग्नानंतर त्यांच्या आईने धर्मपरिवर्तन केले आणि त्या हिंदू झाल्या. आईने अनेक हिंदू भजनं लिहिली आहेत आणि ती गायलीही आहेत असेही गीता गवळींनी सांगितले. त्यापुढे म्हणाल्या की, लग्न झाले तेव्हा त्यांची आई 14 वर्षांची होती. 

नक्की वाचा: ठाणे–घोडबंदर मार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! पुढील 2 दिवस वाहतुकीत मोठा बदल

'डॅडी' चित्रपटासाठी पैसे मिळाले ?

अरुण गवळी याच्यावर आधारित 'डॅडी' (Daddy) चित्रपटाच्या निर्मितीबद्दल बोलताना, गीता गवळी यांनी सांगितले की, त्यांच्या वडिलांची असा चित्रपट बनावा अशी फार इच्छा नव्हती, मात्र इतरांच्या इच्छेमुळे ते तयार झाले होते. एकेकाळी गोविंदा दगडी चाळीत आला होता अशी आठवणही गीता गवळी यांनी सांगितली. 'डॅडी' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी अर्जुन रामपालही इथे आला होता असे त्या म्हणाल्या. हा चित्रपट अरूण गवळीवर बनविण्यात आला असून यातून काही पैसे मिळाले का? असा प्रश्न विचारला असता गीता गवळी यांनी आपल्याला पैसे मिळाले नाहीत असे सांगितले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com