लोकसभा निवडणुकीचं वातावरण चांगलचं तापलं आहे. त्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यात एक मोठी घटना समोर आली आहे. त्याची उलटसुलट चर्चा राजकीय वर्तूळात रंगू लागली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामती लोकसभेत इंदापूरमध्ये प्रचाराला पोहोचले होते. त्यावेळी त्याची भेट चक्क वंचितचे शिरूरचे उमेदवार मंगलदास बांदल यांनी घेतली. या भेटी मुळे अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत. याभेटीत चर्चा काय झाली याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
वंचितचा उमेदवार फडणवीसांना भेटला
इंदापूरात देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी सोनाईचे प्रमुख दशरथ माने यांच्या घरी जावून त्यांची भेट घेतली. दशरथ माने यांचा मुलगा प्रवीण माने हे बारामतीत सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत आहेत. या सर्व पार्श्वभूमिवर फडणवीस थेट माने कुटुंबाच्या भेटीला गेले होते. त्याच वेळी तिथं वंचितचे उमेदवार मंगलदास बांदलही उपस्थित होते. यावेळी फडणवीस आणि बांदल यांची भेट झाली. मात्र या दोघांमध्ये यावेळी काय चर्चा झाली हे मात्र बाहेर येवू शकलं नाही.
मंगलदास बांदल भेटी बद्दल काय म्हणाले?
वंचितचा उमेदवार देवेंद्र फडणवीसांना भेटला ही बातमी वाऱ्या सारखी परसरली. या भेटीतून वेगवेगळे तर्कवितर्क काढले जावू लागले. त्यानंतर बांदल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आपण फडणवीसांच्या भेटीला आलो नव्हतो. दशरथ माने हे आमचे नेते आहेत. त्यांना भेटण्यासाठी आलो होतो. योगायोगाने आमची आणि फडणवीस तिथे भेट झाली. असं बांदल यांनी सांगितलं आहे. फडणवीस यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही हेही त्यांनी स्पष्ट केलं. मी वंचितचा उमेदवार आहे. त्यामुळे फडणवीसांबरोबर राजकीय चर्चा करण्याचा प्रश्नच येत नसल्याचं त्यांनी सांगितलं.
वंचित - भाजपची हातमिळवणी?
या भेटीमुळे वंचित आणि भाजपनं अंतर्गत हात मिळवणी केली आहे का? याची चर्चा सुरू झाली. याबाबतही बांदल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. वंचित कोणत्याही स्थितीत भाजपला मदत करत नाही. उलट वंचितनं बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना पाठींबा देवू केला आहे. त्यामुळे वंचित भाजपला मदत करत असल्याचा आरोप चुकीचा असल्याचं ते म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world