मुख्यमंत्रिपदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्याला आता जवळपास दोन महिने उलटून गेले आहेत. फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालयातून कामालाही सुरूवात केली. त्यांनी आपल्या दालनाचा ताबाही त्याच दिवशी घेतला. मात्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षावर राहण्यासाठी गेले नाहीत. ते आजही त्यांच्या आधीच्या सागर याच बंगल्यावर रहात आहेत. त्यामुळे फडणवीस अजूनही वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीत याची चर्चा राजकीय वर्तूळात सुरू झाली आहे. त्यातून अधंश्रद्धेचं राजकारण मात्र चांगलचं रंगलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीत हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. यावरून आता राजकारण चांगलेच रंगले आहेत. देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला जाण्यासाठी का टाळत आहेत? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. त्यांना कसली भिती वाटत आहे? त्या बंगल्यात काही घडले आहे का? याचे उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं पाहीजे. वर्षा हे मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान आहे. असं असतानाही तिथे फडणवीस जायला तयार नाहीत. त्या मागे काय कारण आहे याचं उत्तर शिंदे, कदम किंवा भाजपच्या प्रवक्त्यांनी दिलं पाहीजे असं आवाहनचं संजय राऊत यांनी केलं.
त्या बंगल्यात लिंबू मिरच्या आहेत असं आम्ही काही म्हटलेलं नाही. काळ्या जादूबद्दल कोणी बोलू नये. कारण ती अंधश्रद्धा आहे. अशा प्रकारे कोणी अंधश्रद्धा पसरवत असेल तर त्यावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत कारवाई करायला पाहीजे असंही यावेळी राऊत म्हणाले. तर उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला त्यावेळी टोपलीभर लिंब त्या बंगल्यावर भेटली होती. त्यामुळे काळ्या जादूचे बादशाह कोण? तर ते उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे काळ्या जादू बद्दल राऊतांनी शिंदेना नाही तर ठाकरेंना विचारले पाहीजे, असा टोला कदमांनी या पार्श्वभूमीवर लगावला.
ट्रेंडिंग बातमी - CIDCO Lottery 2025 : सिडकोचे माझे पसंतीचे घर! प्रतिक्षा संपली लॉटरीची तारीख ठरली
त्यावर बोलताना, ते रामदास कदम आहेत ते काही स्वामी रामदास नाहीत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही असंही ते म्हणाले. उलट फडणवीस त्या बंगल्यात राहायला का जात नाहीत याचं उत्तर एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांनी दिले पाहीजे असे प्रति आव्हानच राऊत यांनी दिले. दरम्यान यापूर्वी देवेंद्र फडणवीस हे 2014 ते 19 मध्ये ते तिथे राहिले आहेत. आता ते लवकरच तिथे राहण्यासाठी जाणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकरता प्रत्येक बंगला शुभ आहे कोणताही अशुभ नाही, असं चंद्रशेख बावनकुळेंनी स्पष्ट केलं आहे.