जाहिरात

Jagdeep Dhankhar: जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा, दिलं 'हे' कारण

मी माननीय पंतप्रधान आणि आदरणीय मंत्रिमंडळाचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो, असं ते आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहेत.

Jagdeep Dhankhar: जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा, दिलं 'हे' कारण
नवी दिल्ली:

संसदेचे अधिवेशन सोमवारी सुरू झाले. पहिल्या दिवसाचे सत्र विरोधकांनी गाजवले. ऑपरेशन सिंदूरवरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. त्यामुळे लोकसभेबरोबर राज्यसभेतही गोंधळ झाला होता. राज्यसभेचे कामकाज सभापती जगदीप धनखड यांनी पाहिलं. मात्र दिवस संपताच उपराष्ट्रपती असलेल्या जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला आहे. त्यात त्यांनी आपल्या प्रकृतीचे कारण दिले आहे. त्यामुळे राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आलेल्या या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तूळात मात्र वेगळीच चर्चा सुरू आहे.    

जगदीप धनखड यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे, आदरणीय राष्ट्रपतीजी, आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्यासाठी, मी याद्वारे संविधानाच्या अनुच्छेद 67 (अ) नुसार भारताच्या उपराष्ट्रपतीपदाचा तात्काळ प्रभावाने राजीनामा देत आहे. माझ्या कार्यकाळात माननीय भारताच्या राष्ट्रपतींनी दिलेल्या अटल पाठिंब्याबद्दल आणि आमच्यात असलेल्या समाधानकारक व अद्भुत कार्यसंबंधांबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. असं त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. 

नक्की वाचा - Satara News: शाळकरी मुलीला पकडलं, गळ्यावर चाकू ठेवला, धमकी दिली अन् पुढे अंगावर काटा आणणारा थरार

मी माननीय पंतप्रधान आणि आदरणीय मंत्रिमंडळाचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. पंतप्रधानांचे सहकार्य आणि पाठिंबा अमूल्य होता आणि मी माझ्या कार्यकाळात खूप काही शिकलो आहे. सर्व माननीय संसद सदस्यांकडून मिळालेला स्नेह, विश्वास आणि आपुलकी माझ्या स्मरणात कायम राहील. आपल्या महान लोकशाहीत उपराष्ट्रपती म्हणून मिळालेले अमूल्य अनुभव आणि अंतर्दृष्टीबद्दल मी खूप आभारी आहे. असं ही ते आपल्या पत्रात म्हटले आहेत. 

Saiyaara Box Office: सैयाराने रचला इतिहास, कोणत्याही स्टार किडची सर्वात मोठी ओपनिंग, केले 7 रेकॉर्ड

या महत्त्वाच्या काळात भारताच्या उल्लेखनीय आर्थिक प्रगतीचा आणि अभूतपूर्व वेगाने झालेल्या विकासाचा साक्षीदार होणे आणि त्यात सहभागी होणे हा माझ्यासाठी विशेषाधिकार आणि समाधानाची बाब होती. आपल्या देशाच्या इतिहासातील या परिवर्तनशील युगात सेवा करणे हा खऱ्या अर्थाने सन्मान होता. मी हे प्रतिष्ठित पद सोडत असताना, भारताच्या जागतिक उदयाबद्दल आणि अभूतपूर्व कामगिरीबद्दल मला अभिमान वाटतो आणि तिच्या उज्ज्वल भविष्यावर माझा अटूट विश्वास आहे. असं त्यांनी आपल्या पत्राच्या शेवटी म्हटलं आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com