बृजभूषण सिंह ने विनेश फोगाट पर लगाए गंभीर आरोप
भाजपचे माजी खासदार आणि कुस्ती संघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी कुस्तीपटू विनेश फोगाट यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होवू शकतो. विनेशने नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शिवाय त्या विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यातही उतरल्या आहेत. अशा वेळी भाजप नेते बृजभूषण यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. याच बृजभूषण यांना कुस्ती संघाच्या अध्यक्षपदावरून हटवावे अशी मागणी ज्या कुस्तीपटूने केली होती त्या पैकी एक विनेश फोगाट ही होती.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विनेश फोगाट ऑलम्पिकसाठी पात्र होण्या आधी तिला बेईमानी करून जिंकवण्यात आलं होतं, असा गौप्यस्फोट बृजभूषण सिंह यांनी केला आहे. त्याचीच शिक्षा तिला देवाने ऑलम्पिकमध्ये दिली असे वक्तव्यही त्यांनी केले आहे. एक खेळाडू दोन वजनी गटात चाचणी देवू शकत नाही. हा कुस्तीचा नियमच आहे. पण विनेशने एकाच दिवशी दोन वजनी गटात चाचणी दिली होती. 53 किलो वजनी कटात तिला 10-0 ने पराभूत व्हावे लागले होते. तर 50 किलो वजनी गटात 5-0 असा स्कोअर होता. विनेश विरोधात शिवानी पंवार कुस्ती जिंकण्याच्या स्थितीत होती. त्याच वेळी गोंधळ घातला गेला. रेल्वेच्या पंचाने बेईमानी करत विनेशला विजयी घोषित केले असा आरोपही त्यांनी केला आहे.
ब्रजभूषण सिंह यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची सध्या चौकशी सुरू आहे. जे आरोप आपल्यावर लावण्यात आले ते चुकीचे आहे असेही त्यांनी सांगितले. जे आरोप कुस्तीपटूंनी लावले ते सर्व काँग्रेस पुरस्कृत आहेत. भूपेंद्र हुड्डा आणि दीपेंद्र हुड्डा त्या मागे असल्याचा दावा ही त्यांनी यावेळी केला. आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची चौकशी झाल्यानंतर जो निकाल येईल त्यातून अनेक गोष्टी स्पष्ट होतील. विनेश विरोधात भाजपने प्रचार करायला सांगितला तर तो करू असेही ब्रजभूषण सिंह यांनी सांगितले आहे.
ट्रेंडिंग बातमी - केज मतदार संघात भाजपची डोकेदुखी वाढणार? राखीव मतदार संघात कोण बाजी मारणार?
भारतीय जनता पक्षात अनेक नेता आहेत. काही मोठे नेते आहेत. नेत्यांचा दुष्काळ पक्षात नाही. मात्र जर मला प्रचार करण्यास सांगितला तर मी जरूर करेन असंही त्यांनी सांगितलं. विनेश यांच्या मुळे माझं मोठं नुकसान झालं आहे. शिवाय खेळाचंही नुकसान झालं आहे. त्यांच्या आरोपामुळे महिला खेळाडूंचाही अपमान केला गेला आहे. काँग्रेस मुलींचा आधार घेत राजकारण करत आहे. आपल्या राजकीय आयुष्यात आपण कधीच महिलांचा अपमान केला नाही. उलट काँग्रेसने महिलांचा अपमान केला आहे. भूपेंद्र हुड्डा यांनी अपमान केला आहे असे ते म्हणाले.

विनेश फोगाट ही पॅरिस ऑल्मपिकमध्ये 50 किलो वजनी गटात कुस्तीच्या फायनलमध्ये पोहोचली होती. पण फायनल पूर्वी त्यांचे वजन 100 ग्रॅम जास्त भरले होते. हे वजन कमी करण्यासाठी विनेशने प्रयत्न ही केले. पण तीला पाहीजे तेवढं वजन कमी करता आलं नाही. त्यामुळेच तिला फायनल मध्ये खेळण्यापासून रोखले होते. त्यानंतर विनेश यांनी निवृत्ती जाहीर केली होती. शिवाय पदक जिंकण्याचे स्वप्नही धुळीला मिळाले होते.
ट्रेंडिंग बातमी - शिवसेना विरूद्ध शिवसेना! आमदार बालाजी किणीकरांचा विजयरथ कोण रोखणार?
त्यानंतर विनेश फोगाट यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या तिकीटावर त्या जुलाना विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. बजरंग पूनिया यांच्या बरोबर तिने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना लगेचच पक्षाने उमेदवारीही दिली आहे. त्यामुळे कुस्तीच्या आखाड्यात नशिब आजमावल्यानंतर विनेश आता निवडणुकीच्या आखाड्यात दिसणार आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world