लय भारी!'लाडकी बहीण योजना' सातारा पॅटर्नची राज्यात चर्चा का?

योजना नको पण सरकारी व्यवस्थेला आवरा असं बोलण्याची वेळी लाडक्या बहीणांवर आली. त्यावर आता रामबाण तोडगा काढण्यात आला आहे. तो म्हणजे सातारा पॅटर्न.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाली. त्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक महिलांनी सेतू केंद्रावर एकच गर्दी केली. अनेकांना अर्ज भरण्यात अडचणी आल्या. तर अनेकांना कागदपत्राची पुर्तता करण्यात आली नाही. काही ठिकाणी सरकारी कामकाजाचा फटका महिलांना बसला. त्यामुळे निराश होवून त्यांना घरी परतावे लागले. या सर्व गोष्टी पाहील्यानंतर योजना नको पण सरकारी व्यवस्थेला आवरा असं बोलण्याची वेळी लाडक्या बहीणांवर आली. त्यावर आता रामबाण तोडगा काढण्यात आला आहे. तो म्हणजे सातारा पॅटर्न. या पॅटर्न अंतर्गत आता महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही. सरकारी कर्मचारीच त्यांच्या घरी जावून हा अर्ज भरन घेणार आहेत. हा पॅटर्न ऐकल्यानंतर नक्कीच सर्वाच्यां तोंडून लय भारी आल्या शिवाय राहाणार नाही. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय आहे सातारा पॅटर्न? 

लाडकी बहीण योजनेसाठी महीलांची अनेक ठिकणी फरफट झाल्याचे समोर आले. पण आता ही फरफट सातारा जिल्ह्यात थांबणार आहे. या योजनेसाठी सातारा पॅटर्न राबला जात आहे. तशा सुचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, तलाठी आणि आरोग्य सेविका यांची पथके तयार करण्यात आली आहेत.  पथकाकडे 50 कुटुंबांची जबाबदारी देण्यात आली आहे. ही पथके त्या कुटुंबांच्या घरी जातील. या पथकाकडील सदस्यांकडे सरकारचे नारी अॅप उपलब्ध आहेत. या अॅपवर ते पात्र महिलेचा तिच्या घरीच ऑनलाईन अर्ज भरतील. जी कागदपत्र उपलब्ध नसतील. त्याची माहिती त्याच दिवशी ते पथक संबधीत तलाठ्याला देतील. तो तलाठी तो दाखला पुढच्या दोन दिवसात उपलब्ध करून देईल. अशा प्रकारे पुर्ण अर्ज भरला जाणार आहे. त्यामुळे महिलांना कुठेही जावे लागणार नाही. कार्यालयाचे खेटे मारावे लागणार नाहीत. शिवाय लाईनमध्येही उभे रहावे लागणार नाही. सरकारी कार्यालयाचे यातून हेलपाटे वाचणार आहेत. सर्व गोष्टी या घरी बसूनच होतील असे देसाई यांनी स्पष्ट केले. 

Advertisement

ट्रेंडिग बातमी - Pune News : अखेर 47 दिवसांनंतर, दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाने सादर केला 300 शब्दांचा निबंध!

विक्रमी वेळेत अर्ज भरणार 

सातारा जिल्ह्यात जवळपास 50 लाख महिलांना या योजनेचा फायदा होवू शकतो. जवळपास 8 लाख कुटुंबातील या महिला आहेत. ही संख्या पाहाता नियोजन करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या योजनेत अर्ज करण्याची मुदत ही 31 ऑगस्टपर्यंत देण्यात आली आहे. असे असले तरी सातारा जिल्ह्यात हे काम 6 ऑगस्टपर्यंत पुर्ण केले जातील. शिवाय त्यातील 8 लाख महिलांचे प्रस्ताव हे मंजूरीसाठी पाठवण्याचा मानस प्रशासनाचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.हा पॅटर्न यशस्वी झाल्यास तो राज्यातही लागू केला जाण्याची शक्यता आहे. यामुळे महिलांना मोठा दिलासाही मिळणार आहे. सरकारी कार्यालयाचे खेटेही वाचतील. शिवाय कागदपत्रांसाठी होणारी फरफटही वाचेल. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - दिल्लीतील शाहू महाराजांचा पुतळा बदलण्याची मागणी का सुरु झाली आहे?

काय आहे लाडकी बहीण योजना? 

राज्यातल्या युती सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. ज्या महिलांचे वय 21 ते 65 वर्षे आहे असा महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे. ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापर्यंत आहे त्यांना या योजनेचा लाभ होईल. विवाहीत, विधवा, निराधारा, महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. शिवाय एकाच कुटुंबातील दोन महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकतात. 

Advertisement