पुण्यात पोर्शे कारने दोघा जणांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीला बाल न्याय हक्क मंडळाकडून निबंध लिहिण्याची शिक्षा देण्यात आली होती. यावरून मोठा गदारोळ झाला होता. देशभरातून बाल न्याय हक्क मंडळाच्या निकालावर संताप व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणात अल्पवयीन आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं उघड आल्यावर अल्पवयीन मुलाच्या वडिलांनाही अटक करण्यात आली होती.
दरम्यान या प्रकरणात अल्पवयीन तरूणाने बाल न्याय हक्क मंडळाकडे 300 शब्दांचा निबंध सादर केला आहे. याशिवाय समुपदेशन आणि वाहतूक नियमांचा अभ्यास करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) सोबत काम करणे यासारख्या इतर शिक्षांचे भोगण्याची प्रक्रिया देखील सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
19 मे रोजी पुण्याच्या कल्याणीनंतर भागात मध्यरात्री उशिरा पोर्शे कारने एका बाईकला धडक दिली होती. ही धडक इतकी जबरदस्त होती की, बाईकवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. कार चालविणारा अल्पवयी मुलगा दारूच्या नशेत होता. त्यातूनच हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे.
बातमी अपडेट होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world