सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार का? शरद पवारांच्या मनात काय?

शरद पवारांचा राजकारणातील आतापर्यंतचा अनूभव पाहाता, शरद पवार जे बोलतात अगदी त्याच्या उलटं करतात असा आरोप त्यांचे राजकीय विरोधक नेहमीच करतात.

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यात बरोबर महायुती आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण याचीही चर्चा सुरू झाली आहे. प्रत्येक पक्ष आपलाच नेता मु्ख्यमंत्री व्हावा अशी इच्छा व्यक्त करत आहेत. सध्याच्या स्थितीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील अशी  नावे चर्चेत आहेत. या सर्वांत जर कोणी शांत असतील तर ते नाव आहे शरद पवार यांचे. त्यांनी अजूनही मुख्यमंत्रिपदाबाबतचे आपले पत्ते खोलले नाही. आधी महायुतीची सत्ता घालवू मग मुख्यमंत्री ठरवू अशी भूमीका त्यांनी घेतली आहे. अशीच काहीशी भूमीका खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे. त्यामुळे पडद्या मागे या बाप लेकीचं काही सुरू आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तूळात सध्या दबक्या आवाजात सुरू आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

देवेंद्र फडणवीस असो की उद्धव ठाकरे  त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा त्यांच्या मनात अजूनही आहे. त्यात एकनाथ शिंदे किंवा अजित पवारही मागे नाहीत. इतकेच काय तर नाना पटोले आणि जयंत पाटल यांनीही मुख्यमंत्रिपदाबाबतची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र शरद पवार पहिल्यापासूनच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषीत करण्याच्या बाजूने नाहीत. उलट ते संपूर्ण महाराष्ट्र सध्या पिंजून काढत आहे. राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा त्यांना निर्धार आहे. शिवाय आताची शरद पवारांची संपूर्ण टीम ही नव्या दमाची असणार आहे. त्यासाठी पवार मेहनत घेत आहेत. 

ट्रेंडिंग बातमी -  भाजपचा अंतर्गत सर्वे, पक्षानं घेतला धसका? चाणक्य मैदानात उतरणार

पवारांच्या या मेहनतीचे काही अर्थ ही लावले जात आहेत. जर महाविकास आघाडीचे सरकार आले, त्यात जर राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष झाला तर शरद पवार सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करू शकतात अशी चर्चा आहे. राष्ट्रवादीचे निवडून येणारे बहुतांशी आमदार हे नवखे असणार आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना आपली स्वत:ची टीम उभी करण्यासही शरद पवार मदत करत आहेत. आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांचा वरचष्मा होता. आता तशी स्थिती नाही. सुप्रिया सुळेंसाठी मोकळे मैदान आहे. शिवाय पक्षाचे जेष्ठ नेते जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांच्या निर्णयाला विरोध करतील अशी स्थिती सध्या तरी नाही. त्यामुळे आधी निवडूक ताकदीने लढायची आणि आकडे आपल्या बाजूने असतील तर ऐन वेळी सुप्रिया सुळेंचे नाव मुख्यमंत्री म्हणून पुढे करायचे अशी रणनितीत तर पवारांची नाही ना अशी चर्चा आता सुरू झाली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - 'सिल्लोड आहे की पाकिस्तान , इथं राहायचं की...' दानवेंचे वादग्रस्त वक्तव्य, वाद पेटणार?

शरद पवारांनी मात्र मुख्यमंत्रिपदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. निवडणुकी आधी मुख्यमंत्रिपदाचे नाव जाहीर करण्याला त्यांचा विरोध आहे. आधी महाविकास आघाडी म्हणून संयुक्त नेतृत्वाखाली निवडणुकीला समोरे जावू. निवडणुकीत बहूमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण याचा निर्णय घेवू असे शरद पवार सांगत आहेत. शिवाय सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबतही पवारांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. सुप्रिया सुळे यांना केंद्राच्या राजकारणात रस आहे. त्या लोकसभेत चांगले काम करत आहेत. त्यांची उपस्थितीत सर्वात जास्त आहे असा दाखलेही ते त्यासाठी जोडतात. असं सांगत त्या राज्यात परतणार नाहीत असं सांगण्याचा शरद पवारांचा प्रयत्न आहे. 

ट्रेंडिंग बातमी - 'तिरूपती बालाजीच्या लाडू प्रसादात प्राण्यांची चरबी' मुख्यमंत्र्यांच्या आरोपाने खळबळ, प्रकरण काय?

पण शरद पवारांचा राजकारणातील आतापर्यंतचा अनूभव पाहाता, शरद पवार जे बोलतात अगदी त्याच्या उलटं करतात असा आरोप त्यांचे राजकीय विरोधक नेहमीच करतात. शरद पवारांच्या डोक्यात कधी काय येईल याचा कोणालाही अंदाज येत नाही हाच आतापर्यंतचा अनूभव आहे. शिवाय सुप्रिया सुळे यांनीही याबाबत कोणते स्पष्ट वक्तव्य केलेले नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणायचे आहे. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री करायचा आहे असं वक्तव्य त्या करत आहेत. हे पाहाता या दोघा मायलेकांच्या मनात नक्की काय सुरू आहे याचा ठाव अजूनही कोणाला घेता आला नाही. ते जाणून घेण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.