'राज्यात संशयाचं संभ्रमाचं वातावरण, दिग्गज कसे हरले?' युगेंद्र पवार असं का म्हणाले?

निवडणुकीत लागलेल्या निकालाबाबत युगेंद्र यांनीही संशय व्यक्त केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

विधानसभा निवडणुकीत बारामती मतदार संघातून युगेंद्र पवार यांचा पराभव झाला. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढवली. त्यांचा अजित पवारांनी जवळपास एक लाखाच्या फरकाने पराभव केला. त्यानंतर युगेंद्र पवार यांनी आभार दौरा सुरू केला आहे. यादौऱ्याला त्यांना काटेवाडी गावातून सुरूवात केली आहे. या दौऱ्यात अजित पवार भेटले तर त्याचं ही अभिनंदन करणार असंही यावेळी युगेंद्र पवार म्हणाले. दरम्याना निवडणुकीत लागलेल्या निकालाबाबत युगेंद्र यांनीही संशय व्यक्त केला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बारामती विधानसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी आभार दौरा सुरू केला आहे. बारामती विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभूत झाले. आता युगेंद्र पवारांनी गावोगावी जात मतदारांचे आभार मानायला सुरवात केली आहे. काटेवाडी गावातून या आभार दौऱ्याला त्यांनी सुरुवात त्यांनी केली. ज्या लोकांनी आम्हाला साथ दिली आणि ज्यांनी साथ दिली नाही त्यांच्यापर्यंत आपण परत एकदा गेलं पाहिजे असं ते म्हणाले. शिवाय त्यांचे आभार मानले पाहिजेत. हीच शिकवण शरद पवारांची आहे. असंही त्यांनी यावेळी सांगितलं. त्यासाठी हा आभार दौरा करत असल्याचं युगेंद्र पवारांनी म्हटले आहे.

ट्रेंडिंग बातमी - EVM मध्ये 15% मतं सेट केली गेली? शरद पवारांनी दिलं भन्नाट उत्तर

यावेळी त्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतल्या निकालाबाबत वक्तव्य केलं आहे. आजच्या महाराष्ट्रात संशयाचं आणि संभ्रमाचे वातावरण आहे. राज्यातील अनेक दिग्गज पराभूत झाले. कधीही न हरणारे नेते ही  हरले आहेत. हे का झालं ? असा प्रश्न युगेंद्र पवार यांनी उपस्थित केला. अशा स्थितीत मत फेर तपासणीचा अधिकार सुप्रिम कोर्टाने आम्हाला दिला आहे.  हा अधिकार दिला असंल तर मत पडताळणी करायला काय हरकत आहे, असंही ते म्हणाले.  खरंच लोकांचा तो कल असेल तर तो स्वीकारावाच लागेल. पण नक्की ते का झालं ? कशामुळे झालं ? कुणामुळे झालं ? याचा अभ्यास केला पाहिजे असंही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - नव्या सरकारचा 'कारभार'ही जोरदार! हिवाळी अधिवेशन होणार पेपरलेस अन् डिजीटल; तारीख ठरली!

विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं बहुमत कोणाला मिळालं नव्हतं. तेवढं आता महायुतीला मिळाले आहे. कारखाने,पंचायत समिती,जिल्हा परिषदेच्या आगामी काळात  निवडणुका आहेत. त्यामुळे आम्ही पुन्हा लोकांमध्ये जावू असं युगेंद्र पवार म्हणाले. पराभव झाला असला तरी खचून जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. आपण पुन्हा एकदा कामाला लागलो आहोत असंही त्यांनी सांगितले.  

Advertisement