Ducks In Cricket: क्रिकेटमध्ये शून्यावर आऊट होण्याचे किती प्रकार आहेत?

क्रिकेटमध्ये शून्यावर आऊट होण्याचे 8 प्रकार आहेत. हे अनेकांना माहिती नसते. हे सर्व प्रकार आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रातिनिधिक फोटो
मुंबई:

क्रिकेटमध्ये बॅटिंगला उतरलेल्या प्रत्येक फलंदाजाचं पहिलं लक्ष्य हे शून्यावर आऊट न होणं हे असतं. कोणत्याही मोठ्या खेळीची सुरुवात ही शून्यापासूनच होते. ही सुरुवात शून्यावरच थांबू नये असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. पण, कोणत्याही फलंदाजाला शून्यावर आऊट होणे चुकलेलं नाही. सर डॉन ब्रॅडमनला त्यांची टेस्ट क्रिकेटमधील सरासरी 100 करण्यासाठी शेवटच्या इनिंगमध्ये 4 रन्सची आवश्यकता होती. पण ते शून्यावर आऊट झाले होते.

क्रिकेटमध्ये शून्यावर आऊट होण्याचे 8 प्रकार आहेत. हे अनेकांना माहिती नसते. हे सर्व प्रकार आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

डायमंड डक (Diamond Duck) : एकही बॉल न खेळता फलंदाज आऊट झाला तर तो 'डायमंड डक' वर परतला असं म्हणतात.यामध्ये फलंदाज रन आऊट किंवा बॉल आऊट होतो. अथवा त्यानं खेळात अडथळा आणला तरी त्याला बाद दिले जाते.

गोल्डन डक (Golden Duck) : शून्यावर आऊट होण्याचा हा सर्वात प्रसिद्ध असलेला प्रकार आहे. यामध्ये फलंदाज पहिल्याच बॉलवर आऊट होतो.

सिल्व्हर डक (Silver Duck) : क्रिकेटमधील फारशी प्रचलित नसलेली संकल्पना आहे. फलंदाज दुसऱ्या बॉलवर शून्यावर आऊट झाल्यास त्याला 'सिल्व्हर डक' वर आऊट झाला असे म्हंटले जाते.

ब्रॉन्झ डक (Bronze Duck) : फलंदाज तिसऱ्या बॉलवर शून्यावर आऊट झाल्यास त्याला 'ब्रॉन्झ डक' म्हंटले जाते. 

रॉयल डक (Royal Duck) : एखाद्या सीरिजच्या पहिल्याच बॉलवर फलंदाज शून्यावर आऊट होणे म्हणजे 'रॉयल डक'.

लॉफिंग डक (Laughing Duck) : एखादा फलंदाज पहिल्याच बॉलवर शून्यावर आऊट झाला आणि तो आऊट झाल्यानंतर संपूर्ण इनिंगही संपली तर त्याचे आऊट होणे 'लॉफिंग डक' या प्रकारात येते

Advertisement

किंग पेअर (King Pair) : एकाच मॅचमधील दोन्ही इनिंगमध्ये शून्यावर आऊट झालेल्या फलंदाजाला 'किंग पेअर' मिळाले असं म्हणतात.

बॅटिंग हॅटट्रिक (Batting Hat-Trick) : टेस्ट क्रिकेटमध्ये हा प्रकार असतो. टेस्टमधील सलग तीन इनिंगमध्ये फलंदाज शून्यावर आऊट झाल्यास त्याला 'बॅटिंग हॅट्ट्रिक' मिळते.

Topics mentioned in this article