Aakash Chopra on Gautam Gambhir: टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हा आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो. मैदानात किंवा मैदानाच्या बाहेर दोन्ही ठिकाणी गंभीरची आक्रमकता क्रिकेट फॅन्सनी अनुभवली आहे. गौतम गंभीरचा टीम इंडिया आणि दिल्लीमधील जुना सहकारी आकाश चोप्रानं त्याचा एक जुना किस्सा सांगितला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आकाश चोप्रानं राज शमनीच्या पॉडकास्टवर बोलताना गंभीरसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. गंभीर एकदा ट्रक ड्रायव्हरशी कसा भिडला होता, हा किस्सा देखील आकाश चोप्रानं यावेळी सांगितला.
नेमकं काय घडलं होतं?
आकाश चोप्रा यावेळी म्हणाला की, 'गौतम गंभीर असा व्यक्ती आहे, ज्यानं एकदा दिल्लीत ट्रक ड्रायव्हरशी भांडण केलं होतं. तो त्याच्या कारमधून उतरला आणि ट्रक ड्रायव्हरवर भडकला. त्यानं ड्रायव्हरची कॉलर पकडली होती. कारण, ट्रक ड्रायव्हरनं चुकीचं वळण घेतलं होतं, आणि शिव्या देत होता 'गौती तू काय करत आहेस? ' असं मी त्याला त्यावेळी विचारलं होतं, असं आकाशनं सांगितलं.
'गौतम त्याच्या कामाबद्दल गंभीर आणि मेहनती होता. तो नेहमी त्याच्या मनातील गोष्ट स्पष्टपणे सांगत असे. त्याला रागही लवकर यायचा, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, असं आकाश चोप्रानं यावेळी सांगितलं.
( नक्की वाचा : 'जग तुझ्यावर थुंकेल', कपिल देवबद्दल काय म्हणाले युवराजचे वडील? )
राहुल द्रविडचा कार्यकाळ संपल्यानंतर गौतम गंभीरची भारतीय क्रिकेट टीमचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारतीय टीम पहिली टेस्ट सीरिज बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. या सीरिजमधील पहिली टेस्ट 19 सप्टेंबरपासून चेन्नईत खेळली जाणार आहे.
भारतीय टीमचा मु्ख्य प्रशिक्षक होण्यापूर्वी गंभीर कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) मेंटॉर होता. गंभीरच्या मार्गदर्शनाखीलच केकेआरनं आयपीएल 2024 चं विजेतेपद मिळवलं होतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world